शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारपासून खामगावात भव्य कृषी महोत्सव; शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:59 IST

खामगाव : पश्‍चिम विदर्भात पहिल्यांदाच भव्य स्वरुपात खामगावात १६ ते २0 फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या कृषी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खामगावात येत आहेत. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले आहे. 

ठळक मुद्दे शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे कृषी मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांचे आवाहन 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पश्‍चिम विदर्भात पहिल्यांदाच भव्य स्वरुपात खामगावात १६ ते २0 फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या कृषी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खामगावात येत आहेत. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी केले आहे.  ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रयत्नातून बुलडाण्यासह पश्‍चिम विदर्भातील  जिल्हय़ातील शेतकर्‍यांच्या हितासाठी व मार्गदर्शनासाठी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ही सुवर्ण संधी चालून आली आहे.  शुक्रवार, १६ फेब्रुवारी  ते २0 फेब्रुवारीपयर्ंत जलंब रोडवरील पॉलीटेक्नीक कॉलेजच्या भव्य मैदानावर सकाळी १0.00 ते सायंकाळी ६.00 वाजेपयर्ंत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  या महोत्सवाच्या प्रारंभ व प्रचार, प्रसारासाठी शुक्रवारी सकाळी ११.00 वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.प.मैदान येथून भव्य ट्रॅक्टर व बैलगाडी दिंडी निघणार आहे. खामगाव मतदार संघाचे युवा आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात  निघणार्‍या या दिंडीला राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर हिरवी झेंडी दाखवणार असून, नंतर ही दिंडी खामगाव शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्गक्रमण करून तिचा समारोप कृषी महोत्सव स्थळी  होईल. या रॅलीमध्ये खामगाव मतदार संघातील शेतकरी बांधव मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत.

मुख्यमंत्री उद्या खामगावातया महोत्सवाच्या उदघाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी १0.00 वा येत आहेत.  यावेळी राज्याचे कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांचेसह भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.डॉ संजय कुटे, अँड. आकाश फुंडकर यांचेसह आमदार, खासदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

कृषी महोत्सवाचे आकर्षण या कृषी महोत्सवात ४00 हून अधिक स्टॉल आहेत. यामध्ये शेती विषयी  माहिती, तंत्रज्ञान, बिबियाणे, सेंद्रीय शेती, सौर शेती कुंपण, शेती उत्पादने, शेती प्रक्रीया उद्योग, पशुपालन, यासह अत्याधुनिक शेतीची प्रात्यक्षिके दाखविणारे स्टॉल राहणार आहेत.  शासनाच्या योजनांची माहिती याठिकाणी देण्यात येणार आहे. या कृषि महोत्सवास शेतकरी बांधवानी मोठया प्रमाणात भेट देऊन आपल्या शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याचे दृष्टीने नवीन तंत्रज्ञान व शेती पुरक व्यवसाय करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी व फलोत्पादन मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी केले आहे. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव