शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनाधीन नातवाने आर्थिक वादातून केला आजीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 12:30 IST

पैसे द्यावे असा तगादा आरोपी नामदेव नागरे साततत्याने त्यांच्याकडे लावत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: तालुक्यातील खुरमपूर येथे ९० वर्षीय आजीचा ४० वर्षीय नातवाने आर्थिक कारणावरून विळ््याने गंभीर स्वरुपात वार करून खून केल्याची घटना तीन सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी नातवा अटक केली आहे.मात्र या घटनेमुळे खुरमपूर येथे सकाळी चांगलीच खळबळ उडाली होती. या घटनेत मृत पावलेल्या आजीचे नाव लक्ष्मीबाई लिंबाजी नागरे (९०) असे आहे तर खून करणाऱ्या नातवाचे नामदेव बावराव नागरे असे नाव आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. गुरूवारी पहाटे नामदेवची आजी ही गाढ झोपेत असताना आरोपी नामदेव भावराव नागरे याने तिच्यावर घरातीलच विळ््याने वार करून गंभीर जखमी केले. त्यातच लक्ष्मीबाईचा मृत्यू झाला. मृत लक्ष्मीबाई नागरे या माजी सैनिकाच्या पत्नी असल्याने त्यांना पेन्शन मिळत होती. त्यामुळे त्यांनी पैसे द्यावे असा तगादा आरोपी नामदेव नागरे साततत्याने त्यांच्याकडे लावत होता.या घटनेची माहिती गावात पसरताच आरोपी नामदेव नागरे याने घरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना गुरूवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पोलिसांनाही ग्रामस्थांनी या खुनाची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली.दरम्यान, आरोपीली व्यसन असल्याने तो त्याच्या आजीकडे नियमित पैशाची मागणी करत होता. बºयाचदा त्याने तिच्याके दागिनेही मागितले होते. मात्र ते न दिल्याने आरोपी नामदेव भावराव नागरे याने तीन सप्टेंबर रोजी सकाळी विळ््याने सपासप वार करून आजीची हत्या केल्याची चर्चा ग्रामस्थामध्ये आहे. त्या आधारावर पोलिसांनी नामदेव नागरे यास ताब्यात घेतले. या प्रकरणी सदाशिव लिंबाजी नागरे (६०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केलाआहे. घटनेचा पुढील तपास पोलिस अधिकारी अझरशेख हे करीत असून त्यांना हेड कॉन्स्टेबल बन्सी पवार, सुरेश बोरे, सचीन सौभागे, कैलास चतरकर, चंद्रशेखर मुरडकर, गजानन ठाकरे हे तपास करत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी