शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीत दोषी आढळल्याने ग्रामसेवक निलंबित

By admin | Updated: July 7, 2017 00:14 IST

चौकशीत दोषी आढळल्याने ग्रामसेवक डी.एन. भारस्कर यांना निलंबित करण्याची कारवाई गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : तालुक्यातील मोहोतखेड ग्रामपंचायतमध्ये तेरावा व चौदा वित्त आयोग, कर वसुली तसेच एल.ई.डी. लाइटमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गावातीलच शिवाजी भोपाळे यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे १९ जून २०१७ रोजी केली होती. चौकशीत दोषी आढळल्याने ग्रामसेवक डी.एन. भारस्कर यांना निलंबित करण्याची कारवाई गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी केली आहे.

लोणार पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतमध्ये विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागण्या पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. त्यावर कारवाई होताना दिसत नाही; मात्र मोहोतखेड येथील ग्रामस्थ शिवाजी भोपाळे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामांमधील भ्रष्टाचाराची सखोल माहिती घेऊन त्याचा पाठपुरावा केला.मोहोतखेड ग्रामपंचायतमध्ये तेरावा व चौदा वित्त आयोग, कर वसुली एल.ई.डी. लाइट तसेच निजामपूर येथे तेराव्या वित्त आयोगातून सन २०१४-१५ मध्ये सिमेंट काँक्रिट रस्ता निकृष्ट बनविणे, अशा अनेक संबंधित सरपंच, सचिव व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी गावातील शिवाजी भोपाळे यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे १९ जून २०१७ रोजी केली होती. मागणीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत ग्रामसेवक डी.एन. भारस्कर दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याची वेळ गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्यावर आली. ग्रामसेवक डी.एन. भारस्कर ऐनकेन कारणामुळे नेहमीच चर्चेत असल्यामुळे अधिकारी त्यांना अगोदरच त्रस्त झालेले होते. त्यातच त्यांना मुद्दा मिळाल्याने अशी कारवाई केल्याची चर्चा असून, चिरिमिरी घेऊन रस्त्याची लांबी, रुंदी वाढवून देणाऱ्या अभियंता अधिकाऱ्यांना का पाठीशी घातल्या जात आहे, हा कळीचा मुद्दाही ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.