लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : मागण्या मंजुर झाल्याने ग्रामसेवक संघटनेने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. १४ सप्टेंबर रोजी ना. पंकजा मुंडे यांच्यासोबत प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डिएनई १३६ ची चर्चा झाली. यावेळी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करून पंचायत विकास अधीकारी या एकाच पदाला तत्वत: मान्यता, ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता १५०० रूपये आदीबाबत लवकरच आदेश काढण्याच्या सुचना ना. पंकजा मुंडे यांनी संबंधित विभागास दिल्या. ग्रामसेवक शैक्षणीक अहर्ता पदवीधर करून त्वरीत आदेश काढण्यात येणार. ४ जानेवारी २०१७ च्या अनियमीतेबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतची फाईल तात्काळ निकाली काढावी, असे ना. पंकजा मुंडे यांनी सांगितले. अतीरिक्त कामे कमी करण्यासाठी सविस्तर चर्चा होऊन गठीत समितीच्या शिफारशीनुसार योग्य कार्यवाही करण्याबाबतचे आदेश देण्यात आले. आंदोलनादरम्यान ना. चंदशेखर बावणकुळे, ना. गिरीष महाजन यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी फोनव्दारे चर्चा घडून आली. याचाही मोठा फायदा ग्रामसेवक युनियनला झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे, कोषाध्यक्ष संजिव निकम, कार्याध्यक्ष गळगुंडे तात्या, मानद अध्यक्ष अनिल कुंभार, उपाध्यक्ष सुचित घरत, संयुक्त सचिव सचिन वाटकर, प्रसिद्धी प्रमुख बापु अहीरे, संपर्क प्रमुख उदय शेळके, विभागीय सचिव कमलेश बिसेन, विभागीय अध्यक्ष घोळवे, नारायण बडे, शिवराम मोरे, सहसचिव कोकण, भालके, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष धारपूरे, एन.डी.कदम, भोसले, हरीभाऊ लोहे, दिपक दवंडे, रमेश मुळे, पूंडलीक पाटील, उबाळे अन्ना, वाव्हलजी, सचिव कोल्हे, सुधाकर बुलकुंदे, अशोक काळे, तुकाराम सदावर्ते, विष्णू इंगळे, गोविंद गीते, शिवाजी जाधव, भाऊसाहेब मिसाळ, शहाजी नरसाळे, बागायतकर, शेळके आना शेख आदी उपस्थित होते. बैठकीनंतर सर्वांनी पंचायत समितीमधून चाव्या घेऊन आपापल्या ग्रापंचायतीला हजर व्हावे, असे आवाहन संघटनेने केले, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख बापू फुला अहिरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
ग्रामसेवक संघटनेचे आंदोलन स्थगित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 17:25 IST