मोताळा (जि. बुलडाणा): गेल्या काही महिन्यांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात अधीक्षकासह तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्यांची पदे रिक्त असल्याने ्नरुग्णांना सुविधा पुरविण्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे हे देखणे रुग्णालय फक्त शोभेची वास्तू ठरले आहे. रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदने व आंदोलन केले गेले. तथापि, फायदा झाला नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी ३ मे रोजी ग्रामीण रुग्णालयाला कुलूप ठोकले.मोताळा येथे ३0 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारले आहे. रुग्णालयातील मंजूर २७ पदांपैकी १0 रिक्त असून, त्यामध्ये वैद्यकीय अधीक्षकासह एमबीबीएस पात्रतेच्या तीन पदांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अमोल नाफडे यांच्याकडे या रुग्णालयाचा प्रभार देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने अपघाताच्या घटनांतील रुग्णांची संख्याही मोठी असते. त्यामुळे येथे कायम व नियमित अधिकारी-कर्मचारी असणे गरजेचे आहे. तथापि, रिक्त पदांची स्थिती अनेक दिवसांपासून कायम असल्याने रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त शिवसैनिकांनी ३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास रिक्त पदे भरण्याची मागणी करीत सर्व कर्मचार्यांना बाहेर काढून रुग्णालयालाच कुलूप ठोकले. जोपर्यंत रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी मिळणार नाहीत, तोपर्यंंत कुलूप उघडले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका गजानन मामलकरसह शिवसैनिकांनी घेतली व थेट दवाखानाच्या छतावर जाऊन आंदोलन सुरू ठेवले. रुग्णालयाला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच, बोराखेडीचे ठाणेदार व कर्मचार्यांनी येऊन आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला; मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी येथे येऊन रिक्त पदांचा प्रश्न निकाली काढावा, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनटक्के व खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी चर्चा करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालयाला कु लूप ठोकले!
By admin | Updated: June 4, 2016 02:42 IST