शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींना मिळणार कामगिरीवर आधारित निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:16 IST

बुलडाणा: १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना कामगिरीवर आधारित थेट निधी मिळणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे भौगोलिक क्षेत्र, कर वसुली, पायाभूत सुविधांचा दर्जा पाहून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींचा समावेश

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना कामगिरीवर आधारित थेट निधी मिळणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे भौगोलिक क्षेत्र, कर वसुली, पायाभूत सुविधांचा दर्जा पाहून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. याबाबत निधी वितरणाचे निकष व सनियंत्रणाचे मार्गदर्शक सूचना ग्रामविकास विभागाने जारी केल्या असून, निधी मिळविण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकार्‍यांचा कस लागणार आहे.१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्तरावर मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे बळकटीकरणासाठी संपूर्ण अनुदान ग्रामपंचायत स्तरावर देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने यापूर्वीच घेतला आहे; मात्र हा निधी मिळविण्यासाठी शासन निकषाचे पालन करावे लागणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीला स्वउत्पन्नात वाढ करून लेखे अद्ययावत ठेवणे व लेखापरीक्षणही करणे आता बंधनकारक आहे. १४ व्या वित्त आयोगाचा निधी मिळण्यासाठी दोन वर्षाच्या कालावधीतील लेखापरीक्षण अहवालाचा विचार केला जाणार आहे. ग्रामपंचायतीचे लेखे अचूक व पूर्ण लेखेविहित वेळेत परीक्षणासाठी उपलब्ध करण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर आहे. ग्रामस्थांना देण्यात येणार्‍या सेवांचा खर्च त्यांच्याकडून वसूल केला पाहिजे. ग्रामपंचायतींनी त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत बळकट करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसाठी दर चार वर्षांनी फेरआकारणी करणे आवश्यक आहे. जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, गौण खनिजसारख्या स्वउत्पन्नाबाबतचा पाठपुरावा करणे ग्रामविकास विभागाला अपेक्षित आहे. 

आतापर्यंत मिळाला १३७ कोटींचा निधी१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामीण स्वराज्य संस्थांना त्यांच्या बळकटीकरणासाठी २0१५-१६ या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्षासाठी पंचायत राज संस्थांच्या अधिकारात, कामात आणि हस्तांतरित करण्यात येणार्‍या निधीत व्यापक सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत कामगिरीच्या आधारावर १३७ कोटींच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. आर्थिक स्थितीच्या बळकटीशिवाय ग्रामपंचायती चांगले काम करू शकणार नाही. 

लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रानुसार मिळणार निधीजिल्ह्यातील सहभागी ८६९ ग्रामपंचायतींना त्यांच्या लोकसंख्येनुसार तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार निधी मिळणार आहे. शासनाकडून जिल्ह्याला मिळालेला निधी हा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या मूल्यांकनानंतर लोकसंख्येनुसार ९0 टक्के व भौगोलिक क्षेत्रानुसार १0 टक्के मिळणार आहे. 

मूल्यांकनानंतर मिळणार अधिक १0 टक्के निधी८६९ ग्रामपंचायतींना लोकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार मिळालेल्या निधीच्या १0 टक्के अधिक निधी ग्रामपंचायतींच्या मूल्यांकनानुसार खर्च करता येईल. मूल्यांकनानंतर ४९ पर्यंत गुण असल्यास मंजूर निधीच्या ५0 टक्के, ५0 ते ६0 दरम्यान गुण असल्यास ७0 टक्के, ६१ ते ७0 दरम्यान गुण असल्यास ८0 टक्के तर ७१ टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास मंजूर निधीच्या १00 टक्के प्रमाणात विकास निधी मिळणार आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत