शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election Results : युवा नेतृत्वाला संधी, प्रस्थापितांना धक्का 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 12:17 IST

Gram Panchayat Election Results: मतदारांनी तरूणांना संधी देत प्रस्थापितांना धक्का दिला.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे लांबलेल्या ४९८ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सोमवारी धक्कादायक निकाल समोर आले. मतदारांनी तरूणांना संधी देत प्रस्थापितांना धक्का दिला. प्रत्येक फेरीमध्ये उत्सुकता वाढविणाºया निकालात काही ठिकाणी उमेदवारांची सरशी झाली. त्याचवेळी प्रतिस्पर्धी उमेदवारांना सपाटून मार खावा लागला.   ४९८ ग्रामपंचायतींच्या ९ हजार २२९ उमेदवारांसाठी सोमवारी  १३ तालुक्यांच्या मुख्यालयी सकाळी नऊ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला.   मतमोजणी केंद्राबाहेर सकाळपासूनच उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. पेढे भरवित, गुलालाची उधळणही करण्यात आली. खामगाव तालुक्यातील बहूतांश मोठ्या गावांमध्ये काँग्रेस समर्थीत पॅनलने विजय मिळविला असून, भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तालुक्यात तीन ठिकाणी इश्वरचिठ्ठीने निवड झाली. तर १२५ उमेदवार अविरोध झाले. तसेच तीन जागांसाठी अर्जच आले नव्हते. मलकापूर तालुक्यात  काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस विचारसरणीचा वरचष्मा असल्याचे नुकत्याच हाती आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून सिद्ध झाले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वच उमेदवारांचे खामगावात स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्ष, भारिप बहुजन महासंघ कार्यालयात विजयी उमेदवारांना पेढे भरविण्यात आले. गांधी चौकातील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात विजयी उमेदवारांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गावातील शांतता भंग करणाऱ्या आणि विकास कामांना खो देणाऱ्या राजकारण्यांच्या पॅनेलला अनेक बड्या ग्रामपंचायतीत ब्रेक दिल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत मातब्बरांना चपराक बसली आहे.  सिंदखेड राजा तालुक्यात पालकमंत्री ना.डाॅ.राजेंद्र शिंगणे यांनी महत्वाच्या ग्रामपंचायतींवर राष्टवादी काॅंग्रेसने वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात माेठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथे तसेच ग्रामस्थांना विकासाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. लाेणार तालुक्यात कही खुशी तर कही गमची स्थिती आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी युवकांना संधी दिल्याचे चित्र आहे. चिखली तालुक्यात अमडापूरसह काही ठिकाणी महाविकास आघाडीने यश मिळवले आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या मादणी गावात शिवसनेने वर्चस्व मिळवले आहे. मेहकर तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्षांनी हिवरा खुर्द गावात वर्चस्व राखले आहे. बुलडाणा तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेल्या देउळघाट ग्रामपंचायतमध्ये काॅंग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. जिल्ह्यात सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी विजय मिळवल्याचा दावा केला आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी ४९८ पैकी बहुतांश ग्रामपंचातींमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या विचारांच्या पॅनलनी विजय मिळवल्याचे सांगितले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliticsराजकारण