शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत पोटनिवडणूक : तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन प्रक्रिया ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:08 IST

बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक व ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात येत आहेत; मात्र तांत्रिक अडचणींमुळे नामनिर्देशनपत्र अपलोड करण्यात अडचण येत असल्यामुळे अर्ज सादर करण्याच्या दुसर्‍या दिवशी ६ फेब्रुवारीपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही.

ठळक मुद्देदुसर्‍या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक व ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात येत आहेत; मात्र तांत्रिक अडचणींमुळे नामनिर्देशनपत्र अपलोड करण्यात अडचण येत असल्यामुळे अर्ज सादर करण्याच्या दुसर्‍या दिवशी ६ फेब्रुवारीपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.प्रशासनाचे सर्वच विभाग ऑनलाइन होत असल्यामुळे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराचे पारंपरिक पद्धतीऐवजी संगणकीकृत पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नामनिर्देशनपत्रे भरण्यापासून उमेदवार निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र जारी करण्याची कार्यवाही पार पडेपर्यंतचे सर्व टप्पे आयोगाच्या आज्ञावलीनुसार संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ३ सार्वत्रिक व १0२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे.  या निवडणूक कार्यक्रमानुसार ५ ते १0 फेब्रुवारी दरम्यान नामनिर्देशनपत्रे ऑनलाइन भरणे, १२ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करणे, १५ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेणे, २५ फेब्रुवारी रोजी मतदान, २६ फेब्रुवारी रोजी मतमोजणीची तारीख, ठिकाण जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्‍चित करणे तर २७ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे; परंतु तांत्रिक कारणामुळे नामनिर्देशनपत्र अपलोड होत नसल्यामुळे इच्छुक उमेदवार अडचणीत आले आहेत. 

बुलडाणा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीत पोटनिवडणूकबुलडाणा तालुक्यातील दहिद खुर्द, गुम्मी, कुंबेफळ, माळवंडी, नांद्राकोळी, उमाळा, रायपूर, साखळी खुर्द तसेच घाटनांद्रा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार बुलडाणा तहसील कार्यालयात गर्दी करीत आहेत; मात्र ऑनलाइन नामनिर्देशनपत्रे अपलोट होत नसल्यामुळे ऑफलाइन अर्ज घ्यावेत, अशी मागणी होत आहे.

निवडणूक आयोगाकडून ऑनलाइन नामनिर्देशन अर्ज भरण्याचे आदेश आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी इंटरनेटला स्पिड असेल, त्यावेळी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करावेत. काही तांत्रिक अडचण असल्यास लवकरच सोडविण्यात येईल.- आर.डी.देशमुख, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक