शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election : ५० जणांची सभा, प्रचारासाठी एक चारचारी, दोन दुचाकींची मुभा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 12:42 IST

Gram Panchayat Election: केवळ ५० जणांचीच सभा घेता येणार असून, १ चारचाकी वाहन व दोन दुचाकीवर कार्यकर्ते घेऊन जाता येणार आहे.

-  विवेक चांदूरकर

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळच्या आचारसंहितेत कोरोनामुळे बरेच बदल झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार करताना उमेदवारांना एकावेळी केवळ ५० जणांचीच सभा घेता येणार असून, १ चारचाकी वाहन व दोन दुचाकीवर कार्यकर्ते घेऊन जाता येणार आहे.कोरोनामुळे दरवेळीपेक्षा निवडणूक प्रचाराच्या नियमात निवडणूक आयोगाने बराच बदल केला आहे. प्रचार करताना मोठ्या सभा घेता येणार नसून, ५० जणांची मऱ्यादा  आहे. तसेच केवळ १ चारचाकी वाहन व दोन दुचाकींवरून कार्यकर्त्यांसोबत फिरता येणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत प्रचारादरम्यान संसर्ग वाढू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. यात उमेदवारासह केवळ पाच व्यक्तींच्या गटाला घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी मिळणार आहे. एकाचवेळी केवळ पाच कार्यकर्तेच एकत्र येऊन प्रचार करू शकतात. निवडणुकीदरम्यान नागरिकांनी एकत्र येणे, मिरवणुकीचे आयोजन करणे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांद्वारा निकष लावण्यात आले आहेत. मेळाव्याच्या प्रवेशासाठी बाहेर पडण्याची स्वतंत्र व्यवस्था असणाऱ्या मैदानाची पाहणी करण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक अंतराच्या दृष्टीने चिन्हांकित खुणा करण्यात येणार आहेत. कोरोनासंदर्भातील मार्गदर्शन तत्त्वे पाळली जातात की नाही, याविषयी नोडल अधिकारी लक्ष देणार आहेत. उमेदवारांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या खबरदारीसाठी फेसमास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग आदींच्या पूर्ततेची शहानिशा करावी लागणार आहे. या तरतुदीचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई होईल.

उमेदवारांना केवळ ५० जणांची सभा घेण्याचीच परवानगी आहे. तसेच प्रत्येक उमेदवाराला केवळ एक चारचाकी वाहन व दोन दुचाकी वाहनांचाच प्रचारासाठी वापर करता येणार आहे.

- शीतल रसाळ, तहसीलदार, खामगाव

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkhamgaonखामगाव