शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील धान्य साठा, विद्यार्थ्यांची गोळाबेरीज सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 12:31 IST

तांदूळ व डाळी किंवा कडधान्याचे विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना वितरीत करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळी व कडधान्याचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळेतील धान्य साठा आणि विद्यार्थ्यांची गोळाबेरीज सुरू झाली आहे. विद्यार्थी अथवा पालक आजारी असल्यास त्या विद्यार्थ्यांचे तांदूळ, डाळी घरपोच दिल्या जाणार आहे.कोरोनाची दहशत सर्वत्र निर्माण झाली आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व सरकारी व खासगी शाळा, अंगणवाडी बंद आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य शाळेतच पडून आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने आहार देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळी किंवा कडधान्याचे विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना वितरीत करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये नियोजन करण्यात येत आहे.तांदूळ, डाळी व कडधान्य वस्तू नेण्यासाठी शाळा स्तरावर गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक यांना टप्प्या टप्याने शाळेमध्ये बोलविण्यात येणार आहे. त्यानंतर तांदूळ व डाळी, कडधान्य आदीचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी किंवा पालक आजारी असल्यास अशा विद्यार्थ्यांचे तांदूळ, डाळी, कडधान्य घरपोच दिले जाणार आहे. जिल्हा परिषकडून सर्व शाळांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार सध्या हालचाली सुरू आहेत.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत शिल्लक असलेल्या तांदूळ, डाळी, कडधान्ये यांचे विद्यार्थ्यांना वाटप करणेबाबत सर्व गटशिक्षाणिकारी व मुख्याध्यापकांना सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत गर्दी जमा होणार नाही व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची संपूर्ण दक्षता व काळजी घेतली जाणार आहे.- एजाज खान, शिक्षणाधिकारी, प्राथमिक बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा