बुलडाणा : देऊळगाव राजा शहरातील शहरातील स्वस्त धान्य दुकानदार संतोष निमोदियांचा खून झाल्याची घटना दहा जून रोजी दुपारी उघडकीस आली आहे. जालना-देऊळगाव राजा मार्गावरील भीवगाव फाट्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. दहा जून रोजी रात्री त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होत होता. यासंदर्भात संतोष निमोदियांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र रात्री संतोष निमोदियांचा शोध लागू शकला नव्हता. दरम्यान, रविवारी दुपारी भीवगावनजीकच्या डोंगरावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती देऊळगाव राजा शहरात पोहोचली होती. त्यानंतर मृत व्यक्ती हे संतोष निमोदिया असल्याचे समोर आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस सध्या भीवगाव येथील डोंगरावर पोहोचले आहेत. मृत संतोष निमोदियांना लाठ्या काठ्यांनी हाता पायावर बेदमपणे मारहाण केल्याच्या खुना दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सोबतच त्यांची स्कूटीही भीवगाव डोंगराच्या पायथ्याशी सापडली आहे. नेमक्या कोणत्या कारणावरून त्यांची हत्या झाली ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या संदर्भात देऊळगाव राजा शहरात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.
देऊळगाव राजातील स्वस्त धान्य दुकानदाराचा खून; डोंगरावर आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 14:29 IST
बुलडाणा : देऊळगाव राजा शहरातील शहरातील स्वस्त धान्य दुकानदार संतोष निमोदियांचा खून झाल्याची घटना दहा जून रोजी दुपारी उघडकीस आली आहे.
देऊळगाव राजातील स्वस्त धान्य दुकानदाराचा खून; डोंगरावर आढळला मृतदेह
ठळक मुद्देजालना-देऊळगाव राजा मार्गावरील भीवगाव फाट्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मृत संतोष निमोदियांना लाठ्या काठ्यांनी हाता पायावर बेदमपणे मारहाण केल्याच्या खुना दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.नेमक्या कोणत्या कारणावरून त्यांची हत्या झाली ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे.