या समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले होते. तर प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी सदस्य केशवराव मेतकर, आजीवन सभासद विनायकराव पुंडकर, विलासराव हरणे, अॅड. बाबासाहेब भोंडे, विष्णू पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल गारोडे होते. यावेळी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांना कोविड नियमांचे पालन करून पदवी प्रदान करण्यात आली. प्रमुख मान्यवरांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. प्रास्ताविक डॉ. वनिता पोच्छी, सूत्रसंचालन डॉ. गणेश माल्टे, तर आभार डॉ. जे. जे. जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. जुक्कलकर, प्रा. काटोले, डॉ. मुळे, डॉ. कलाखे, प्रा. गावंडे, प्रा. कोलते, डॉ. काळे, डॉ. जाधव व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
श्री शिवाजी महाविद्यालयात पदवीदान समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST