शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडापाठोपाठ रेखाकलेचे गुण गेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी दरवर्षी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट रेखाकला परीक्षा घेतल्या जातात. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना ...

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी दरवर्षी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट रेखाकला परीक्षा घेतल्या जातात. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना ग्रेडनुसार दहावी बोर्ड परीक्षेत गुण दिले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे रेखाकलेच्या दोन्ही परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे दहावीच्या वर्गातील चित्रकलेची अंतिम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार नाहीत. दरम्यान, अनेक विद्यार्थी सातवी आणि आठवीच्या वर्गातच या परीक्षा देतात. त्यामुळे त्यांना तरी चित्रकला गुण द्यावेत, अशी मागणी कलाशिक्षकांमधून होत आहे. जिल्ह्यातून चित्रकला गुणांसाठी अनेक विद्यार्थ्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे दाखल झाले आहेत. पुढील कार्यवाहीसाठी ते राज्य मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे रेखाकलेचे गुण मिळणार की नाही, याबाबत विद्यार्थी, कलाशिक्षकांमध्ये संभ्रम आहे.

ग्रेडनुसार मिळणारे गुण

ए-७

बी-५

सी-३

दरवर्षी चित्रकलेची परीक्षा घेतली जाते. हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. दोन सत्रांत परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना प्रतिसाद चांगला असतो. मागील दोन वर्षांत ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय न करता रेखाकलेचे गुण देण्यात यावेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचा विचार करता रेखाकला परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावेत.

-विवेक नागरिक, कलाशिक्षक

आम्ही रेखाकलेच्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. बोर्डात शाळेच्या वतीने प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे गुण देण्यात यावेत. गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

-धीरज सरनाईक, विद्यार्थी

चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्यांनी गुणांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. अनेकजण दहावीच्या वर्गात असताना चित्रकलेची अंतिम परीक्षा देणार होते. मात्र, कोरोनामुळे चित्रकला परीक्षा होऊ शकली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

-पायल इंगळे, विद्यार्थिनी