शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे धोरण हेच शेतकरी आत्महत्यांचे कारण - वडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:10 IST

सिंदखेडराजा: एका दाण्याचे हजार दाणे देणरा शेतीचा व्यवसाय असतानाही तो आज तोट्यात आहे. त्यामुळे यामध्ये येण्यास आज कोणी तयार नाही. कारण सरकारचे धोरण हेच खरे शेतकर्‍यांचे आत्महत्याचे कारण आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांनी २0 ऑक्टोबर रोजी तढेगाव येथे केले.

ठळक मुद्देलोकजागर परिवाराच्या वतीने ‘वंदन पेरत्या हाताला’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: एका दाण्याचे हजार दाणे देणरा शेतीचा व्यवसाय असतानाही तो आज तोट्यात आहे. त्यामुळे यामध्ये येण्यास आज कोणी तयार नाही. कारण सरकारचे धोरण हेच खरे शेतकर्‍यांचे आत्महत्याचे कारण आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांनी २0 ऑक्टोबर रोजी तढेगाव येथे केले. शेतकर्‍यांचा कल्याणकारी बळीराजाचा इतिहास युवा पिढीच्या मेंदूत जतन करण्यासाठी लोकजागर परिवाराच्या वतीने आयोजित ‘वंदन पेरत्या हाताला’ या शेतकरी स्मृती गौरव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हनून शेतकरी नेते लक्ष्मण वडले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर, तेजराव चेके यांच्यासह  विनोद वाघ, सरपंच रामदास कहाळे, दीपक कायंदे, पंढरी दराडे, अश्‍वीन सानप आदी उपस्थित होते. बळीराजाचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. पुढे बोलताना वडले म्हणाले की, घटनेमध्ये दोनशेपेक्षा जास्त कायदे हे शेतकरीविरोधी करून ठेवले असल्याने शेतकर्‍यांच्या मालाला भाव नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार असले, तरी आमच्या उन्नतीकडे लक्ष देत नाही. या देशाला अन्यधान्य आम्ही पुरवतो हा आमचा गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकरी हा आज मुलीचे लग्न मुलांचे शिक्षण करू शकत नाही. त्यामुळे आमच्या मुला-मुलींनासुद्धा आत्महत्या कराव्या लागतात. आमच्या मायमावल्यांना सकस आहार मिळत नसल्याने त्यांना अनेक आजार होत आहेत. एकीकडे आमचे रात्रंदिवस काम करण्याने रक्त आटत आहे तर भांडवलदार गब्बर होत आहे. हे सरकार आम्हाला फक्त अश्‍वासनावर भुलवणारे आहे. ६0 वर्षामध्ये जेवढे काँग्रेसने लुटले नाही तेवढे यांनी नोटाबंदीतच लुटले. नोट बंदीमध्ये  अनेक जन रांगा करून मरण पावले; पण  हे मोठमोठाले व्यापारी, पुढारी भांडवलदार हे कधी रांगेत उभे राहिले, त्यांचे पैसे कधी बदलण्यात आले, असे विविध प्रश्न  त्यांनी उपस्थित केले. तसेच कर्जमाफीसाठी आम्हाला पती-पत्नीला थम्ब देण्यासाठी बंधन घालता तर भांडवलदारांचे कर्ज माफ करताना त्यांना असे बंधन का नाही?  आम्हाला कर्जमाफी नको आमच्या घामाच्या पिकाला हमी भाव द्या. आता यापुढे सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा देऊन शेतकरी व त्यांच्या युवा मुलांनी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे अवाहन वडले यांनी केले.