शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाबाबत शासकीय कार्यालयांचीच उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:19 IST

शौचालय बांधकामासाठी केंद्र व राज्य शासन  कोट्यवधी रुपये खर्च करीत असले, तरी देऊळगावराजा शहरातील  अनेक कार्यालयांमध्ये शौचालयाची दुरवस्था     झाली आहे. बहुतांश  शासकीय कार्यालयातील शौचालय बंद असल्याने शौचालयाबाबत  शासकीय कार्यालयांचीच उदासीनता दिसून येत आहे. 

ठळक मुद्देबहुतांश कार्यालयांमधील शौचालय बंदचसफाई कामगाराची नेमणूक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : शौचालय बांधकामासाठी केंद्र व राज्य शासन  कोट्यवधी रुपये खर्च करीत असले, तरी देऊळगावराजा शहरातील  अनेक कार्यालयांमध्ये शौचालयाची दुरवस्था     झाली आहे. बहुतांश  शासकीय कार्यालयातील शौचालय बंद असल्याने शौचालयाबाबत  शासकीय कार्यालयांचीच उदासीनता दिसून येत आहे. शहर तथा ग्रामीण भागामध्ये मोठय़ा प्रमाणावर शौचालय बांधण्यासाठी  जनजागृतीचे काम सुरू आहे. नागरिकांना पथनाट्याद्वारे, कलाप थकाद्वारे, भजन, कीर्तनाच्या माध्यमातून शौचालयाचे महत्त्व पटवून  देण्यात येत आहे; परंतु देऊळगावराजा शहरातील शासकीय  कार्यालयांमधील शौचालयाची झालेली दयनीय अवस्था या शासकीय  कार्यालयांची उदासीनता दाखविणारे चित्र बहुतांश कार्यालयात  बघावयास मिळते.  शहरी भागात न.प.ने शौचालय उद्दिष्टपूर्तीचा अं ितम टप्पा गाठला असला,  तरी पालिकेच्या कार्यालयातील पुरुष  प्रसाधनगृह सोडता महिलांसाठी योग्य सुविधा नाही. याचबरोबर  शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष  नसल्याने त्यांची दुरवस्था झालेली आहे. पालिकेकडून सध्या विविध  भागांमध्ये गुड मॉर्निंग पथक सकाळ-संध्याकाळी आपले काम करीत  असून, कर्मचारी अतिरिक्त काम करीत आहेत; मात्र पालिकेने  सार्वजनिक शौचालयांची देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज निर्माण  झालेली आहे. ग्रामीण भागासाठी पंचायत समितीची जबाबदारी आहे.  त्यामुळे ग्रामीण भागात युद्धपातळीवर शौचालय बांधण्याचे काम सुरू  असले, तरी पंचायत समितीमधील शौचालय बंद स्थितीत राहत आहे.  तालुक्याचे मुख्य कार्यालय असलेल्या तहसील कार्यालयातील पुरुष  व महिला शौचालय बंद असून, शौचालयाच्या समोर अडगळीच्या  वस्तू पडलेल्या आहेत.  याबाबत तहसीलदार बाजड यांना विचारले असता, त्यांनी नवीन  शौचालयाचा प्रस्ताव पाठविलेला असल्याचे सांगितले. यासह पोलीस  स्टेशन, खडकपूर्णा कार्यालय, तालुका कृषी कार्यालय यासोबतच प्रा थमिक शाळेतील शौचालयाची बिकट अवस्था आहे. 

सफाई कामगाराची नेमणूक नाहीबसस्थानक वगळता अनेक कार्यालयांमध्ये स्वीपर नसल्याने  शौचालय साफसफाईची कामे करण्यात अडचणी येतात. यामध्ये  शौचालय स्वच्छ ठेवणे, पाणी साठवून ठेवण्याचे काम होत नाही.  सदरची कामे कार्यालयातील शिपाई पदावर असलेले कर्मचारी करू  शकत नाही. यासाठी शासन स्तरावरून किमान तीन ते चार  कार्यालयांमिळून एका स्वीपरची नियुक्ती केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.  शौचालय जनजागृतीवर होणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या खर्चामध्ये  स्वीपर नियुक्त्या कंत्राटी अथवा कायमस्वरूपी तत्त्वावर करण्याची  गरज सध्या निर्माण झाली आहे.