शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरासाठी शासनाकडून आठवडाभराची मुदत!

By admin | Updated: May 26, 2017 01:13 IST

गजानन महाराज मंदिरनजीकच्या वस्तीचे पुनर्वसन : मुदतीनंतर चालणार गजराज

लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : शेगाव विकास आराखडा अंतर्गत शहरातील जुन्या मातंगपुरी या लोकवस्तीचे स्थलांतरण करण्याच्या प्रक्रियेत स्थलांतरीत न झालेल्या कुटुंबियांना स्वयंस्फूर्तीनेस्थलांतरीत करण्यासाठी शासनाने आठवडाभराची मुदत दिली आहे. मुदतीनंतरही स्थलांतरीत न झालेल्या घरांवर चोख पोलीस बंदोबस्तात गजराज चालविल्या जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.शेगाव येथील जुन्या मातंगपुरी या वस्तीचे पुनर्वसन आळसणा रस्त्यावरील म्हाडाच्या जागेत होत असून यासाठी तयार करण्यात आलेल्या दोन प्रकारच्या संकुलांमध्ये घरे देण्यात आलेली आहेत. या घरांमध्ये येथील कुटूंबीय स्थलांतरीत होणे आतापर्यंत आवश्यक होते. मात्र येथील काही रहिवासी विविध मागण्यांना घेवून मागील १५ दिवसांपूर्वी नगर परिषदेसमोर आमरण उपोषणास बसले होते. यामुळे स्थलांतरणाच्या कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने येत्या ३० तारखेपर्यंत मातंगपुरीतील कुटूंबियांना हलवून तेथील जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. यात बुधवारी रात्री उशिरा १९ महिलांचे उपोषण सोडविण्यास प्रशासनाने यश मिळविले आहे. त्यामुळे आता मातंगपुरी येथील घरे पाडण्यास प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी पुलकूंडवार यांच्या मार्गदर्शनासाठी स्थानिक विश्रामगृहावर सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत मातंगपुरीतील स्थलांतरीत न झालेल्या कुटूंबियांना स्वयंस्फुर्तीने स्थलांतरीत होण्यासाठी प्रशासनाने आठवडाभराची मुदत दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याउपरही स्थलांतरीत न झालेल्या घरांवर बुलडोजर चालविण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली असून आठवडाभरानंतर ८०० पोलीसांचा बंदोबस्त बोलावणार असल्याचे समजते. सदनिकांचे झाले आहे लॉटरी पद्धतीने वितरणशेगाव शहरातील मातंगपुरी या भागाचे पुनर्वसन करण्यासाठी शेगाव विकास आराखडा अंतर्गत सदनिकांचे बांधकाम आळसणा रस्त्यावर करण्यात आलेले आहे. या सदनिकांचे लॉटरी पध्दतीने पुनर्वसन होणाऱ्यांना वितरण करण्यात आले आहे. दरम्यान मातंगपुरी भागातील पुनर्वसन झालेल्यांपैकी अनेक जण या सदनिकांमध्ये राहायला गेले आहेत. तर उर्वरित पुनर्वसितांनी सदनिकांमध्ये आपल्या सदनिकांचा ताबा घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.