शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय धान्याचा काळाबाजार!

By admin | Updated: March 15, 2016 02:16 IST

मेहकर तालुक्यातील शासकीय गोदामातून कट्टय़ात कमी धान्य येत असल्याचा प्रकार.

मेहकर (जि. बुलडाणा): तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये पुरवठा केल्या जात असलेल्या येथील शासकीय धान्य गोदामामधील गहू व तांदुळाच्या कट्टय़ांमध्ये प्रत्येकी एक ते दोन किलोच्या जवळपास धान्य कमी येत असल्याचा प्रकार १४ मार्च रोजी उघडकीस आला. येथील शासकीय धान्य गोदामाला महिन्याकाठी गहू व तांदुळाचा ९ हजार ७१८ क्विंटल माल येत असून, त्यातील एक टन शासकीय धान्य खुल्या बाजारात जादा दराने विक्रीसाठी जात असल्याचे धक्कादायक वास् तव समोर आले आहे.गोरगबिांना कमी दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासनस्तरावरून अन्नसुरक्षा यांसारख्या विविध योजना राबविण्यात येतात. स्वस्त धान्य दुकानदारांकडे धान्य कमी येत असल्याने काही लाभार्थींंना धान्य वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे दुष्काळी काळात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना येथील शासकीय धान्य गोदामातून धान्याचा पुरवठा केला जातो. येथे गोदामपाल म्हणून योगेश जंगले हे कार्यरत आहेत. शासकीय धान्य गोदामामध्ये महिन्याला ६ हजार ६६0 क्विंटल गहू व ३ हजार ५८ क्विंटल तांदूळ असा एकूण ९ हजार ७१८ क्विंटल गहू व तांदूळ येतो. शासकीय गोदामात असलेल्या गहू व तांदुळाच्या प्रत्येकी ५0 किलोच्या कट्टय़ामध्ये एक ते दोन किलोच्या जवळपास धान्य कमी येत असल्याचा प्रकार आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी १४ मार्च रोजी उघडकीस आणले. ५0 किलोच्या एका कट्टय़ामागे एक ते दोन किलो धान्य कमी याप्रमाणे येथील शासकीय धान्य गोदामात महिन्याकाठी येणार्‍या एकूण गहू व तांदूळ धान्यापैकी १00 क्विंटल म्हणजे एक टन धान्य जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे धान्याची अफरातफर होत असल्याचे प्रकार घडत आहेत; तर दुसरीकडे अनेक गोरगरीब लाभार्थींंना अन्नधान्यापासून वंचित राहाले लागत आहे. काही गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीत रेशन वेळेवर पोहोचत नसल्याने लाभार्थींंवर उपासमारीची वेळ येत आहे.