शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गोपीकिसन बजोरीयांनी घेतला खामगाव पालिकेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 13:55 IST

या बैठकीत पाणी पुरवठा, घरकुल आणि शौचालयासंबधित विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नगर पालिकेतंर्गत विविध समस्या तसेच प्रश्न तडीस नेण्यासाठी विधान परिषदेचे आमदार गोपीकिसन बजोरीया यांनी बुधवारी खामगाव पालिकेचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुखांकडून आ. बजोरीया यांनी माहिती घेतली. या बैठकीला मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी, बांधकाम अभियंता निरंजन जोशी, पाणी पुरवठा तथा आरोग्य अभियंता प्राजक्ता पांडे, विद्युत अभियंता सतीश पुदाके, सहा. कर अधिक्षक शंकर नेहारे, राजेश मुळीक यांच्यासह खामगाव पालिकेतील अधिकारी, विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत पाणी पुरवठा, घरकुल आणि शौचालयासंबधित विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

घरकुल योजनेच्या पीएमएसीवर ठपका!पंतप्रधान आवास योजनेतंर्गत खामगाव नगर पालिकेत मुंबई येथील देवधर असोसिएटस् या कंपनीची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, ही प्रकल्प व्यवस्थापन समिती घरकुल योजनेचे कामकाज रखडविण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला. आपल्या भागातील पीएमसी सोडून मुंबईची पीएमसी नियुक्त करण्यावरही आ. गोपीकिसन बजोरीया यांनी आक्षेप नोंदविला.

 वाढीव पाणी पुरवठा योजनेचीही घेतली माहिती!खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामकाजाची विस्तृत माहिती आ. बाजोरीया यांच्याकडून घेण्यात आली. या योजनेचे कामकाज रखडल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामास दिरंगाईबाबतही त्यांनी सुरूवातीच्या खासगी पीएमसीलाच दोष दिला. पीएमसीने चुकीचे काम केले असल्यास त्यांना सुरूवातीला चुका सुधारण्याची संधी द्या, त्यानंतर नोटीस द्या, दोन्ही गोष्टी केल्यानंतर त्यांच्या कामात सुधारणा अथवा अपेक्षीत सहकार्य न मिळाल्यास त्यांच्या गुन्हे दाखल करण्याची तरतूद करा, अशा सूचनाही आ. बजोरीया यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :khamgaonखामगावGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीया