शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला; खामगावात चोख पोलीस बंदोबस्त

By अनिल गवई | Updated: September 28, 2023 10:41 IST

लाकडी गणेशाचे आगमन झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ

खामगाव : ''तू निघालास पुन्हा परतीच्या वाटेवर, तुझ्या निरोपाचा क्षण येताच, मन झाले भावविभोर...'' अशाच काहीशा भावना खामगावातील तमाम भाविकांसह गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांच्या  असल्याचे श्रींच्या विसर्जन मिरणवुकीत  गुरूवारी पहाटेपासूनच दिसून येत आहे.  घरगुती गणेशाचे पहाटेपासून तर सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला  मानाचा लाकडी गणपती सहभागी झाल्यानंतर सकाळी ९.२१ वाजता  फरशी येथून सुरुवात झाली. 

येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत ३२ श्री गणेश मंडळे सहभागी झाली आहेत. विसर्जन मिरवणुकीत श्री गणेश मंडळांकडून विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात येत आहेत. मिरवणुकीत गांधीचौकातील वंदेमातरम मंडळाने यंदा प्रथमच  हरियाणा हिस्सार येथून बाहुबली हनुमान व शिव तांडव नृत्य पथक निमंत्रित  केले. हा देखावा आबाल वृध्दांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याचे दिसून आले.  या देखाव्यासह  विविध आखाड्यांच्या मल्लांनी सादर केलेले चित्तथराक प्रात्यक्षिकांनी अनेकांचे लक्ष वेधले.  श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी  खामगाव शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

चौकट...मान्यवरांकडून  फरशी  येथे पूजन सकाळी  ०९.५४वाजता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी फरशी चौकात मानाच्या गणेशाचे पूजन केले. यावेळी आमदार ऍड आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष गणेश माने, दर्शनसिंग ठाकूर, लाकडी गणेश विश्वस्त मंडळाचे सुरज अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आर.बी. अग्रवाल, डॉ. अनिल चव्हाण, या पोलिस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण परदेशी, पोलीस स्टेशनचे निरीक्षक शांतीकुमार पाटील यांच्यासह मान्यवरांच्य हस्ते मानाच्या गणेशाचे पूजन झाले.

 . मिरवणुकीच्या प्रारंभी खामगावचा राजा मानाचा लाकडी गणेश त्यानंतर तानाजी मंडळ तर तिसऱ्यास्थानी हनुमान मंडळाचा गणपती आणि नंतर विविध गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी विविध गणेश मंडळांच्या आखाड्यांनी मल्लखांब तसेच रोप मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. तर वंदेमातरम मंडळाचा बाहुबली हनुमान मिरवणुकीत सहभागी होताच, मिरवणुकीचा नूरच पालटला. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव