शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णपदक विजेत्या मिहीर आपारचे बुलडाण्यात जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 11:51 IST

Gold medalist Mihir Apar's welcome in Buldana : नागरिकांनी स्वयंस्फुर्तपणे सजविलेल्या वाहनात त्याची मिरवणूक काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पोलंड येथे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशीपमध्ये कंपाऊंड राऊंडमध्ये तणावातही दमदार कामगिरी करत भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या मिहीर नितीन आपारचे बुलडाण्यात १८ ऑगस्ट रोजी जंगी स्वागत करण्यात आले. नागरिकांनी स्वयंस्फुर्तपणे सजविलेल्या वाहनात त्याची मिरवणूक काढली.सुवर्ण पदक मिळविल्यानंतर बुलडाण्यात प्रथमच दाखल झाल्यानंतर त्याचे आ. संजय गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या वतीने भावपूर्ण स्वागत करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौक ते निवासस्थान अशी सजविलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आ. संजय गायकवाड, मिहीरचे आई-वडील, प्रशिक्षक चंद्रकांत इलग विजूभाऊ वानखडे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांच्यासह बुलडाण्यातील मोठा जनसमुदाय या मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिहीरच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रात जल्लोष होत आहे.

भावनिक झालो होतोअमेरिकेवर कंपाऊंड राऊंडमध्ये मात केल्यानंतर भारताला सुवर्णपदक मिळाल्याची जाणीव होताच भावनिक झालो होतो. नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हे ही सुचत नव्हते. माझ्या यशाचे श्रेय हे आई-वडील आणि प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांचे आहे. या यशाने भारावून न जाता सातत्यपूर्ण कामगिरी करण्यावर भर राहील, असे मिहीर आपार याने यावेळी बोलताना सांगितले.

आर्चरी सेंटर कार्यान्वीत करणारबुलडाण्यात आर्चरी सेंटर त्वरेने उभे करण्यास आपण प्राधान्य देणार असून त्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून दिवाळीपर्यंत बुलडाण्यात आर्चरी सेंटर उभे राहील. या सेंटरमधूनच भविष्यातील सुवर्णपदक विजेते खेळाडू निर्माण होतील, अशी भावना आ. संजय गायकवाड यांनी मिहीरचा जयस्तंभ चौकात सत्कार करताना व्यक्त केली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा