शेगाव (जि. बुलडाणा) : पाळण्यासाठी पाहिजे असल्याची बतावणी करून गोर्हे विकत घेऊन ते कसायाला विकल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींना शेगाव न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रेणुका नगर येथील रूस्तम प्रल्हाद आवारकर यांचेशी खोटे बोलून त्यांच्याकडील गोर्ह्याचा शिवाजी अवचितराव शेळके आणि भिमराव शेळके यांनी सौदा केला व सदर गोर्हा रफीक नामक कसायाला विकला ही बाब बुधवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गोर्हा जप्त करून तिघांना अटक केली. गुरूवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तिघांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. आरोपींविरूध्द महा.गौरक्षण अधिनियम १९७७ सुधारणा कायदा ५ (२) सन १९९५ नुसार क.३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय वाघमोडे हे करीत आहे.
गो-हे कसायाला विकले, गुन्हा दाखल
By admin | Updated: July 10, 2015 00:09 IST