मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील तिघ्रा येथे रविवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात गोर्हा ठार झाल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये दहशत पसरली आहे. मोताळा तालुक्यातील तिघ्रा येथील शेतकरी शेषराव सदाशिव कुकडे यांनी शनिवारच्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतात मोकळय़ा जागी चार जनावरे बांधली होती. दरम्यान, रात्री बिबट्याने एका गायीच्या वासरावर हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या वासराने दोर तोडून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. दरम्यान, बिबट्याने गोर्हय़ावर हल्ला केला. गोर्हय़ाच्या गळय़ातील दोरी तुटली नसल्याने बिबट्याने गोर्हय़ाचा फडशा पाडला. दुसर्या दिवशी रविवारी सकाळी शेतात गेल्यावर बिबट्याने गोर्हय़ावर हल्ला करून गोर्हा ठार केल्याचे दिसून आले. या घटनेनंतर गावात एकच धावपळ उडाली. याबाबत वनविभागाकडे माहिती दिल्यावरून वनपाल राठोड, मुंढे, देशमाने, वाघ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या हल्ल्यात शेतकर्याचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकर्याने सांगितले. हिंस्र प्राण्याच्या दहशतीने व गावालगत बैलावर झालेल्या हल्ल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने याचा बंदोबस्त करावा व नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात गो-हा ठार
By admin | Updated: May 16, 2016 01:25 IST