शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ सृष्टीस ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा द्या - ज्योती खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:20 IST

जिजाऊ सृष्टीचा विकास वेगाने होण्यासाठी जिजाऊ सृष्टीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी जि.प. सदस्य डॉ. ज्योती खेडेकर यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत ज्योती खेडेकर यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : मातृतीर्थ सिंदखेडराजा ते जालना रोडवर शेकडो एकर परिसरात जिजाऊ सृष्टी उभारण्याचा प्रकल्प वेगाने पूर्णत्वास जात आहे. या जिजाऊ सृष्टीवर दरवर्षी १२ जानेवारी रोजी राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून लाखो जिजाऊभक्त मासाहेबांना वंदन करण्यासाठी येतात. त्यामुळे या जिजाऊ सृष्टीचा विकास वेगाने होण्यासाठी जिजाऊ सृष्टीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी जि.प. सदस्य डॉ. ज्योती खेडेकर यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे.मातृतीर्थ सिंदखेडराजा हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ आहे. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेबांचे जन्मस्थळ आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. याच ठिकाणी गेल्या २५ वर्षांपासून मराठा सेवा संघाच्या पुढाकारातून भव्य जिजाऊ सृष्टी प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात जिजाऊ भक्तांची निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी, यासाठी जिजाऊ सृष्टीचे संयोजक प्रयत्नरत आहेत. या ठिकाणी वाचनालय, जिजाऊ चरित्र चित्र प्रदर्शन, भव्य सभागृह तसेच देश-विदेशातून येणार्‍या जिजाऊ भक्तांसाठी निवासाची व्यवस्था अशी अनेक विकास कामे होणे अपेक्षित आहे. आजवर जिजाऊ सृष्टीचा विकास समाजातील दानशूर आणि शिवदानातून मिळणार्‍या रकमेतून करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाने केला आहे. भविष्यात या ठिकाणी येणार्‍या जिजाऊ भक्तांच्या सुविधेसाठी अनेक विकास कामांसाठी निधीची आवश्यकता आहे. यापूर्वी अनेक नेत्यांनी या जिजाऊ सृष्टीवरील विचारपीठावरून सृष्टीच्या विकासासाठी निधी देण्याचे मान्यही केले आहे; मात्र आजवर प्रत्यक्षात तशी कारवाई झालेली दिसत नाही. या पृष्ठभूमीवर ८ जानेवारी रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्य बैठकीत जि.प. सदस्य डॉ.ज्योती खेडेकर यांनी शासनाने दीक्षाभूमी नागपूर, पोहरा देवी संस्थान, भगवान गड आदी स्थळांच्या धर्तीवर जिजाऊ सृष्टीसदेखील ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन जिजाऊ सृष्टीच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणावर निधीसुद्धा देण्यात यावा, अशी मागणी ना. फुंडकर यांच्याकडे केली आहे. 

विद्यापीठ अधिसभेवर ज्योती खेडेकर यांची नियुक्तीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभेवर जि.प. सदस्य डॉ. ज्योती शिवशंकर खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलडाणा जि.प. शिक्षण समिती गटातून त्यांची नियुक्ती झाली असून, याबाबतचे पत्र विद्यापीठाचे कुलसचिव यांना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ९ जानेवारी रोजी दिले आहे.

टॅग्स :chikhali roadचिखली रोड