अष्टविनायक ज्ञानपीठ जानेफळ येथे २४ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टरांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी डॉक्टर असोसिएशन जानेफळचे अध्यक्ष डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. धनराज राठी, डॉ. केशव अवचार, डॉ. दीपक गवई, डॉ. सचिन दिवटे, डॉ. संजय लाहोटी, डॉ. योगेश टणमणे, आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रवीण देशमुख यांनी आपली भूमिका विषद केली. कोरोनाच्या काळात खासगी डॉक्टर रुग्णसेवा देत असताना शासनाने प्राधान्याने त्यांना कोरोना लस देण्याची गरज आहे. १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ झालेला असताना वेळोवेळी या डॉक्टरांनी स्वतः कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पाठपुरावा करूनसुद्धा प्रतिसाद मिळत नाही. शासनाच्या या धाेरणाचा निषेध डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केला. नाइलाजास्तव १ मार्चपासून रुग्णसेवा बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
खासगी डॉक्टरांना कोरोना प्रतिबंधक लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:48 IST