पिंपळगाव सैलानी(जि. बुलडाणा), दि. २१- सैलानी बाबाच्या यात्रेत होळीच्या दिवशी १२ वर्षीय मुलगी सैलानी होळीच्या गर्दीतून बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीचे वडील कोडूबा विठ्ठल नवघरे रा. धानोर कवठा ता.कंधार जि.नांदेड यांनी रायपूर पोलीस स्टेशनला दिलीमुलीचे वडील व आई चांगुना नवघरे हे त्यांचा मुलगा व मुलगी सोबत घेऊन सैलानी यात्रेत आले होते. होळीच्या दिवशी मुलगी निहा कोडूबा नवघरे (१२ वर्ष) रंग सावळा अंगाला पंजाबी ड्रेस हातावर तिच्या व लहान भावाचे नाव विठ्ठल गोंधलेले, नाकात सोन्याची मोरणी, रंग काळा-सावळा असे वर्णन आहे. वडिलांच्या तक्रारीवरून रायपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
सैलानी परिसरातून मुलगी बेपत्ता
By admin | Updated: March 22, 2017 01:47 IST