शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सुलतानपूर येथे आरोग्य यंत्रणेची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:16 IST

सुलतानपूर : येथे ‘डेंग्यू तापाने घेतला चिमुकलीचा बळी,  महिनाभरातील दुसरी घटना’, या मथळ्याखाली वृत्त ‘लोकम त’मध्ये प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.  

ठळक मुद्देप्रभाव लोकमतचाआरोग्य यंत्रणा खडबडून झाली जागी

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : येथे ‘डेंग्यू तापाने घेतला चिमुकलीचा बळी,  महिनाभरातील दुसरी घटना’, या मथळ्याखाली वृत्त ‘लोकम त’मध्ये प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.  दरम्यान, आरोग्य यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी सुलतानपूर गावाची  पाहणी करून तुंबलेल्या नाल्या, परिसरातील अस्वच्छता दूर  करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.चव्हाण व लोणार तालुका  वैद्यकीय अधिकारी डॉ.पबितवार यांनी गावकर्‍यांच्या घरातील  पाणीसाठे, स्वच्छता याबाबत काय काळजी घ्यावी, याविषयी  नागरिकांना माहिती दिली. दरम्यान, चिखली, बुलडाणा, मेहकर,  देऊळगावराजा, सिंदखेडराजा आदी ठिकाणच्या आरोग्य  पर्यवेक्षकांनी सुलतानपुरातील परिसराचे  सर्वेक्षण केले. तसेच या  वृत्ताची माहिती मिळताच माजी मंत्री सुबोध सावजी यांनीही सुल तानपूर व वडगाव तेजन गावाला भेट देऊन डेंग्यूसदृश तापाने मृ त्यू पावलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. मृतक  चिमुकल्याचे वडील सै.अलीम यांच्या घरी जाऊन सावजी यांनी  आस्थेने चौकशी केली. सरकारी दवाखान्यात सुविधा मिळत  नाही, रुग्णांची काळजी घेतल्या जात नाही, शासकीय यंत्रणा  केवळ पगारापुरतेच काम करते, या चिमुकल्यांच्या मृत्यूला  शासन आणि प्रशासच जबाबदार असल्याचा आरोप सावजी  यांनी यावेळी केला. पुढे बोलताना सावजी म्हणाले, की सरकारी  दवाखान्यावर विश्‍वास बसेल, अशी प्रशासनाने व्यवस्था  करावी. हीच घटना मुंबई-पुणे येथे झाली असती तर शासनाने  आर्थिक मदत दिली असती. ग्रामीण भागातील सरकारी यंत्रणेचे  कोणतेच अधिकारी मृतक चिमुकल्यांच्या नातेवाइकांची साधी  विचारपूससुद्धा करायला आले नाही. दरम्यान, वडगाव तेजन ये थील मृतक चिमुकलीच्या घरी तिचे वडील संतोष शिरसाट  यांचीसुद्धा सावजी यांनी भेट घेतली.   मृतकाच्या नातेवाइकांना व  उपचार घेत असलेल्या रुग्णांना आरोग्य यंत्रणेने भेट देऊन मदत  करावी, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली.  यावेळी त्यांच्यासोबत शे.हारुण, बबन पनाड, के.के.तेजनकर,  सीताराम दानवे, प्रल्हाद पनाड, आशिष देशमुख, शे.मोसीब,  शे.अमीन, शे.अमीर, रामदास जाधव, रंगनाथ शिरसाट, किसन  शिरसाट, विठोबा जाधव, भगवान पवार आदींची उपस्थिती हो ती. 

टॅग्स :Healthआरोग्य