शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

 प्रत्येक पंचायत समितीच्या आवारात बांधणार ‘घरकुल’ प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 11:52 IST

Panchayat Samiti News घरकुल कसे बनवावे, कसे असावे,  याबाबत हा घरकुलाचा डेमो पंचायत समितीच्या आवारात बांधण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी प्रत्येक पंचायत समितीच्या आवारात घरकुलाची प्रतिकृती (डेमो हाऊस) बांधण्यात येणार आहे.  घरकुल कसे बनवावे, कसे असावे,  याबाबत हा घरकुलाचा डेमो पंचायत समितीच्या आवारात बांधण्यात येणार आहे.तालुक्यातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी हे घरकुल खुले ठेवण्यात येणार आहे. सर्वांसाठी घरे २०२२ या शासनाच्या धोरणांतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करणे यासाठी राज्यामध्ये २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या शंभर दिवसांच्या कालावधीत ‘महाआवास अभियान’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत घरे बांधत असताना त्या ठिकाणची स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पारंपरिक बांधकाम पद्धती, स्थानिक स्तरावर उपलब्ध होणारी साधनसामग्री, आदींचा विचार करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात बांधण्यात येणारे घरकुल लाभार्थ्यांना राहण्यासाठी चांगले असावे. बांधकामाला मार्गदर्शक ठरावे, या धर्तीवर त्या ठिकाणची घरकुले बांधली जावीत, या उद्देशाने स्थानिक परिस्थितीचा सारासार विचार करून प्रत्येक तालुक्यात एक डेमो हाऊस बांधण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना आहेत.  स्थानिक जिओ मॅटिक कंडिशनचा विचार करून  घरकुले बांधण्याबाबत मार्गदर्शक सूचनांच्या आधारे प्रत्येक तालुक्यात एक डेमो हाऊस बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना आहेत.    घरे बांधत असताना हाऊस डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे व इतर बाबींचा त्यामध्ये समावेश आहे.      

टॅग्स :khamgaonखामगावpanchayat samitiपंचायत समिती