शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्री अडगाव येथील महिलांचा पाण्यासाठी घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:06 IST

संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री अडगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे व १४0 गाव पाणीपुरवठायोजनेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांना, महिलांना व अबालवृध्दांना गत २७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

ठळक मुद्देहिवाळ्य़ातच पाणीटंचाई महिलांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील पिंप्री अडगाव येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे व १४0 गाव पाणीपुरवठायोजनेच्या पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांना, महिलांना व अबालवृध्दांना गत २७ दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदने सुध्दा दिली होती. मात्र पाणी प्रश्नावर प्रशासनाने कुठलाही पर्याय उपलब्ध करुन न दिल्यामुळे अखेर अभयसिंह मारोडे तसेच प्रहार जनशक्ती पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वात १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता गावातील शेकडो महिला व पुरुषांचा घागर मोर्चा गटविकास अधिकार्‍यांच्या दालनात पोहचला मात्र गटविकास अधिकारी हे हजर नसल्यामुळे शेकडो महिलांचा व नागरिकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार यांनी पं.स.चे पाणीपुरवठा कक्षाचे कर्मचारी यांना बोलावल्यानंतर व गावातील पाईपलाईनचे १४0 गावाच्या पाईपलाईनला जोडणी करुन देवून तात्काळ  ही पाईपलाईन जोडल्यानंतर हा मोर्चा परत गावाकडे दुपारी ४ वाजता परतला.गत २७ दिवसांपासून पिंप्री अडगाव येथे पाणीटंचाई असल्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी मोलमजुरी सोडून व कामबंधे सोडून पाण्यासाठी भटकावे लागत होते. यासाठी बर्‍याच वेळा नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे व ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनेही दिली. मात्र यावर कुठल्याही उपाययोजना ग्रा.पं.च्यावतीने होत नसल्यामुळे शेकडो महिलांचा घागर मोर्चा दुपारी १ वाजता पंचायत समितीमध्ये तर दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयात धडकला होता. त्यामुळे या मोर्चाची धास्ती घेत व पाणीप्रश्न दूर करण्यासाठी तहसीलदार राठोड यांनी पं.स.च्या पाणीपुरवठा कर्मचार्‍यांना बोलावून व पिंप्री अडगाव येथे ग्रामसचिव व सरपंच यांना पाठवून गावातील पाईपलाईन ही १४0 गाव पाणीपुरवठा येाजनेच्या पाईपलाईन सोबत जोडण्यात यावी अशी सूचना दिल्यानंतर पाणीपुरवठा कर्मचार्‍यांनी तात्काळ गावात जावून ही पाईपलाईन जोडल्यानंतर व १४ नोव्हेंबर पर्यंत १४0 गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी हे ग्रा.पं.च्या विहिरीत सोडण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यानंतर हा घागर मोर्चा परत दुपारी ५ वाजता गावाकडे परतला. यावेळी या मोर्चात अभयसिंह मारोडे, शुभम चिकटे, अनिकेत शेळके, पुरुषोत्तम गायगोळ, विजय ढोले, रवींद्र खुपसे तसेच शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.- 

टॅग्स :Waterपाणी