शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडसारख्या योजना लुटण्यासाठी - तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:28 IST

 शासनाच्या नाफेडसारख्या योजना शेतकर्‍यांच्या टाळुवरील लोणी खाण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी केले. वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजाराच्या प्रांगणात आयोजित कापूस- सोयाबीन परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल :  शासनाच्या नाफेडसारख्या योजना शेतकर्‍यांच्या टाळुवरील लोणी खाण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी केले. वरवट बकाल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजाराच्या प्रांगणात आयोजित कापूस- सोयाबीन परिषदेत ते बोलत होते.तुपकर म्हणाले की, शासनाने शेतकर्‍याच्या वाटेतील काटे काढले नसून,  कर्जमाफीचे अर्ज भरण्यासारख्या योजनेतून वाटेत काटे टाकले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शासनाने राजकारण करण्यासाठी एक प्रकारे वापर केला. देशातील कर्नाटक राज्यात सोयाबीनला जास्त भाव आहे; पण महाराष्ट्रात सोयाबीनला कमी भाव दिला जात असल्याने हा अन्याय नव्हे काय? नोटबंदी करून सरकारने देशातील जनतेला आर्थिक मंदीत टाकले. शेतकर्‍यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नसून, आश्‍वासनाची खैरात वाटल्याचा प्रकार शासन करते, ही शोकांतिकाच नव्हे काय? शेतकर्‍यांना शेती पिकवूनही शेतमालाला योग्य भाव न देता त्याचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप करीत देशातील केंद्र व राज्य शासनावर टीका केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी रामदास भोपळे हे होते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, अमोल राऊत, स्वाभिमानी युवा आघाडीचे प्रशांत डिक्कर, विजय पोहनकर, बाळु डोसे यांची समयोचित भाषणे झालीत. व्यासपीठावर श्रीकृष्ण दातार, दामोधर इंगोले, नाना पाटील, मोहन पाटील, रोशन देशमुख, विलास तराळे आदींची उपस्थिती होती. संचालन करून आभार रामेश्‍वर गायकी यांनी मानले. शेतकरी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.