शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोणार इको सेंसेटिव्ह झोनमधील रस्त्यांचा प्रश्न त्वरीत मार्गी लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 11:04 IST

जिल्हाधिकारी यांनी पाठपुरवा करावा असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जैवविविधतेसह लोणार सरोवराच्या काठावरील इजेक्टा ब्लँकेटचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने लोणार-किन्ही रोड आणि लोणार मंठा रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी पाठपुरवा करावा असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. दरम्यान, लोणार पालिकेकडे असलेली निधीची कमतरता पाहता सरोवर काठावर शौचास जाणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी पालिकेला संपूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.लोणार सरोवर संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या अनुषंगाने २२ जुलै रोजी नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. त्यावेळी लोणार सरोवराच्या काठावरून जाणाºया लोणार-किन्ही आणि लोणार मंठा रस्ता हा सरोवराच्या इको सेंसेटीव्ह झोनमध्ये येत आहे. त्यामुळे या रस्त्यांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून तसा प्रस्ताव पाठविण्याबाबत यापूर्वीच्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने स्पष्ट केले होते. हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असता यात जिल्हाधिकारी यांनी स्वत: पाठपुरावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा या संदर्भातील कामांचा आढावा घेवून पाठपुरावा करण्यात यावा, असे स्पष्ट केले असल्याचे सुत्रांनी सांगितले.लोणार सरोवराच्या काठावरून जाणारे हे रस्ते हे इजेक्टा ब्लँकेटच्या ठिकाणी असल्याचा अंदाज आहे. या भागात आढळणारे दगड, खडक हे अमुल्य आहे. त्यामुळे या रस्त्यांसाठी पर्याय शोधण्यात यावा, असे जून महिन्याच्या मध्यावर घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान स्पष्ट करण्यात आले होते. त्या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवून हा मुद्दा मार्गी लावावा, असे म्हंटले आहे. किन्ही रोड परिसरातील अमुल्य खडकाच्या जतनासोबतच इजेक्टा ब्लँकेटच्या जतनालाही महत्तव देणे गरजेचे आहे. दुसरीकडे लोणार सरोवरात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी उभारण्यात आलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवितांना लोणार पालिकेला निधीसह अन्य काही बाबींची अडचण जात आहे. त्याबाबत खंडपीठात पालिकेच्या वतीने अनुषंगीक माहिती देण्यात आली. त्यानुषंगाने पोलिस प्रशासनाने सरोवर काठाच्या परिसरात शौच्छास कोणी जाणार नाही किंवा त्यास प्रतिबंध घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आदेशच नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

वन्यजीव विभागास मिळाला एसीएफलोणार सरोवर संरक्षण व संवर्धनासाठी वन्यजीव विभागात अधिकाºयांची कमतरता असून त्यादृष्टीने वन्यजीव विभागासाठी सहाय्यक वन्यजीव संरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकाºयांची गरज असल्याचे सहा जुलै रोजीच्या खंडपीठाच्या सुनावणी दरम्यान समोर आले होते. त्यासंदर्भाने २२ जुलै पुर्वी प्रधान सचिव (वने) यांनी संबंधीत अधिकाºयांची नियुक्ती करावी, असे आदेश दिले होते. त्याचीही पुर्तता झाल्याचे २२ जुलै रोजीच्या सुनावणी दरम्यान स्पष्ट झाले. या ठिकाणी आता दोन अधिकारी लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचे सुत्रांनी सांगितले असून सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) म्हणून साबळे आणि वनपरीक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) सानप हे लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा