शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
5
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
6
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
7
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
8
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
9
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
10
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
11
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
12
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
13
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
14
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
15
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
16
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा
17
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
18
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
19
Life Lesson: तुम्हाला अतिविचार करण्याची सवय आहे? मग 'हा' गुरुमंत्र येईल कामी!
20
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?

शक्तिमानचा जिल्हाधिकाºयांच्याहस्ते गौरव

By admin | Updated: June 20, 2017 13:30 IST

फासे पारधी समाजातून यश मिळविणाºया या मुलाचा जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारीयांनी स्वत: आपल्या दालनात गुणगौरव केला.

हिवरा आश्रम : लहानपणापासून आय.पी.एस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्याफासे पारधी तांड्यावरील शक्तीमान युवराज पवार याने इयत्ता दहावीच्यापरिक्षेमध्ये ८४ टक्के गुण घेऊन यश मिळविले आहे. फासे पारधी समाजातूनयेवढे मोठे यश मिळविणाऱ्या या मुलाचा जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारीयांनी स्वत: आपल्या दालनात गुणगौरव केला.शक्तीमान हा फासे पारधी समाजातील असून त्याचे वडील शेती सोबतच फासे पारधीसमाजातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करीत आहे. शक्तीमानच्या दहावीच्यायशाबद्दल त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिद््द, चिकाटीला कठोरपरिश्रमाची जोड देत दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवीले. शक्तिमाननेअत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये आपल्या कठोर परिश्रमाने उत्तुंग भरारीघेत आईवडीलांच्या स्वप्नांना साकार केले आहे. शक्तीमान हा प.पू.शुकदासमहाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाचाविद्यार्थी आहे. मुलाच्या उज्जल भविष्यासाठी युवराव पवार यांनी आपल्याप्रयत्नाची पराकाष्टा केली. शक्तीमानने सुध्दा वडीलांच्या अपेक्षापूर्तीसाठी कुठेच कसर ठेवली नाही. रात्रंदिवस केवळ अभ्यासाचा ध्यास घेऊनदहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळाले. त्याने मिळविलेल्या यशाबद्दलजिल्हाधिकारी पुलकुंडवार आणि अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनीशक्तिमान पवार व त्याच्या आई-वडिलाचा सत्कार केला. यावेळी युवराज पवार,महेंद्र सौभागे, समाधान अकाळ, धर्मराज पवार, सिद्धू खेडेकर, रत्नाताईपवार, विद्यमान पवार आदी उपस्थित होते.फासे पारधी हा समाज आजही शिक्षणाच्या प्रवाहापासून कोसोदूर आहे. जंगलातीलपशू-पक्ष्यांची शिकार करून त्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे लोक.रोजगार नाही, म्हणून वषार्नुवर्ष दारीद्रयात खितपत पडलेली जमात, अशाआदिवासी तांड्यावरती शक्तीमान युवराज पवार यांने दहावीच्या परिक्षेत ८४टक्के मिळवून यशाला गवसणी घातल्याने आदिवासी तांडयावर आनंदाला उधानआल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)