शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गॅसची सबसिडी आली तीन रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 15:36 IST

Gas subsidy News  गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्याला गॅसमागे दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दिवसेंदिवस वाढत असलेल्या गॅसच्या किमतीने सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे ग्राहकांच्या खात्यात दिली जाणारी सबसिडी दोनशे ते तीनशे रुपयांवरून थेट घसरत अवघ्या तीन रुपयांवर आल्याने शासनाने सर्वसामान्यांची थट्टा केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने चोरपावलांनी कधी गॅसची सबसिडी संपविली, याबाबत नागरिक आता चर्चा करू लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी १४ किलो वजनाच्या गॅसला पाचशे ते सहाशे रुपये दर आकारला जात असे. यात प्रत्येक तारखेस कमी-अधिक किंमत आकारली जात असे. दुसरीकडे या गॅसची ग्राहकास सबसीडी अनुदान ग्राहकांच्या खात्यात दोनशे ते तीनशे रुपये जमा केले जाते असे. नोव्हेंबर २०२० मध्ये १४ किलोच्या सिलिंडरची किंमत ६०३ रुपये होती. एक डिसेंबरला ६०३ रुपये, दोन तारखेला ६५३, तर १४ तारखेला ७०३ अशी एकाच महिन्यात तीन वेळा दरवाढ झाल्याने हा गॅस भाववाढीचा उच्चांक आहे. गुरुवारी रात्री पुन्हा २०-२५ रुपयांची वाढ झाल्याने आता गॅसचा दर ७२३ रुपये असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. 

ग्राहक आले जेरीस; सामान्यांच्या खिशाला झळ!  गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्याला गॅसमागे दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत अनुदान दिले जात होते.  त्यामुळे सहाशे रुपयांचा गॅस हा ग्राहकांना चारशे ते साडेचारशे रुपयांना मिळत असल्याने ग्राहकांना काहीअंशी दिलासा होता.  परंतु डिसेंबर २०२० या एकाच महिन्यात तीनदा गॅसचे दर वाढले आहेत, तर गुरुवारीदेखील वीस रुपयांची वाढ झाल्याने गॅसचे दर साडेसातशे रुपयांवर गेले. n परंतु, ग्राहकांना दिले जाणारे अनदान केवळ तीन रुपये दिले जात असल्याने यात थट्टा मांडली जात आहे. भाववाढीच्या तुलनेत सबसिडीत वाढ करण्याऐवजी घट झाल्याने सर्वसामान्य जेरीस आले आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावCylinderगॅस सिलेंडर