शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

बुलडाण्यात अस्वच्छतेचा कळस; जागोजागी कचऱ्यांचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 3:37 PM

बुलडाणा: शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले असून, सांडपाण्याच्या नाल्याही तुडूंब भरल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले असून, सांडपाण्याच्या नाल्याही तुडूंब भरल्या आहेत. बुलडाण्यातील अस्वच्छतेने कळस गाठल्याने नगर पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.स्वच्छतेच्या बाबतीत अनेकवेळा रणकंदन झालेल्या बुलडाण्यातील अस्वच्छता अद्यापही दूर झालेली नाही. विधीमंडळाच्या दालनापर्यंत गेलेल्या बुलडाण्यातील स्वच्छतेच्या प्रश्नावर पालिकेने काही महिन्यापूर्वी वेगवेगळे पाऊले उचलण्यास सुरूवात केली होती. बुलडाण्यातील कचºयावरून वरीष्ठ पातळीपर्यंत तक्रारी झाल्यानंतर आरोग्य मंत्र्यानी नगर पालिकेला कारवाईचा अल्टीमेटम दिला होता. दरम्यान, आरोग्य मंत्र्यांच्या कारवाईच्या भितीने शहरात स्वच्छतेच्या दृष्टीने नवनविन प्रयोग पालिकेने आजमाविले. मात्र ते प्रयोगांनाच अवकळा आली आहे.स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठीच शासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुलडाणा पालिकेने स्वच्छतेवर वाजणाºया गाण्यांची मदत घेण्यास प्रारंभ केला. मात्र ते सुद्धा बंद पडल्याचे दिसून येत आहे.स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यातील सर्वच नगर पालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून थेट घरातूनच कचरा उचलण्यात येत आहे. मात्र बुलडाणा पालिका गेल्या काही महिन्यापासून कचºयाच्या बाबतीत वारंवार चर्चेत येत असल्याचे दिसून येते. पूर्वी बुलडाणा शहरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सध्या त्या ठिकाणी कचरा कुंड्या नसल्याने अनेक नागरिक रस्त्यावरच कचरा फेकतात. परिणामी, काही ठिकाणी अस्वच्छता पसरत असल्याचे चित्र आहे.बसस्थानकासमोरून गेलेली सांडपाण्याची नाली तर सदैव तुडूंब भरलेली दिसून येते. त्याचबरोबर शहरातील नाल्याही घाणीने भरल्याने मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. शहरात सध्या कचरा गोळा करणाºया गाड्या सकाळच्या सुमारास फिरतात; मात्र अनेक भागात ह्या गाड्या पोहचतच नाहीत. या वाढत्या अस्वच्छतेमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.‘स्वच्छ भारत का इरादा’ गेला कुठे?कचरा विलगीकरणाला गती देण्यासाठी कचरा गोळा करणाºया गाड्यांवर ‘स्वच्छ भारत का ईरादा कर लिया हमने!’ असे गीत वाजविले जात होते. सकाळी-सकाळी कचरा गोळा करायला आलेल्या गाडीवर हे गाणे ऐकताच सर्वांचेच याकडे लक्ष जात होते. शहरात जवळपास २५ पेक्षा जास्त गाड्यांवर हे गाणे बसविण्यात आले होते. बुलडाणा पालिकेकडून पहिल्यादांच हा प्रयोग राबविण्यात आला. मात्र काही दिवसात हा प्रयोग बंद झाल्याचे दिसून येत आहे. एकाही गाडीवर हे गाणे सध्या वाजत नसल्याचे चित्र आहे.शहराला लागून ग्रामपंचायतींची स्थितीही चिंताजनकबुलडाणा शहराला लागून असलेल्या मात्र नगर पालिका हद्दीत समाविष्ट नसलेल्या कॉलनीसह गावठाण परीसर व ग्रामपंचायतीची स्वच्छतेच्या बाबतीत चिंताजनक परिस्थिती आहे. बुलडाण्याला लागून सागवण, माळविहिर, सुंदरखेड, व इतर काही ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीकडून सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत खबरदारी घेतली जात नाही. या भागातील नाल्या उपसण्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा