शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

समृद्धी महामार्गावर मेहकर नजीक साडेआठ लाखांचा गांजा जप्त: एलसीबीची कारवाई

By निलेश जोशी | Updated: October 7, 2023 04:58 IST

अकोला व जालन्यातील दोघे ताब्यात

मेहकर (जि.बुलढाणा): समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील साब्रा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाईत ८ लाख ४० हजार रुपयांच्या गांजाच्यासह लोखंडाचा चुरा घेऊन जाणारा एक ट्रक जप्त केला आहे. समृद्धी महामार्गावर गांजा जप्ती संदर्भातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

या कारवाईत पोलिसांनी जालना येथील ट्रक चालक अब्दुल गफूर रशीद (३२, रा. जाफर चाळ, जुना जालना) आणि सहचालक मोहम्मद अबीद मोहम्मद सादिक (३५, रा. आलेगाव, ता. पातूर, जि. अकोला) या दोघांना ताब्यात घेतले आहे. एमएच-२६-बीई ०८५१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये नेण्यात येत असलेल्या लोखंडाच्या चुरीमध्ये हा ४२ किलो गांजा लपवून ठेवला होता.

गोपनिय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साब्रा शिवारातील मेहकर एक्झिस्ट पाईंटवर ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. कारवाईदरम्यान मेहकरचे नायब तहसिलदार नितीन बोरकर हे ही प्रामुख्याने उपस्थित होते.

पोलिसांनी साडेआठ लाख रुपयांचा हा गांजा व १५ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा २३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाईदरम्यान जप्त केला आहे. सध्या हा ट्रक मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लावण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक लांडे यांच्यासह एपीआय विलास कुमार सानप, पीएसआय सचीन कानडे, दीपक लेकुरवाळे, शरद गिरी, गणेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.