शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर ९२ लाखांचा गांजा पकडला, एक जण ताब्यात

By निलेश जोशी | Updated: November 9, 2023 18:05 IST

८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जालना जिल्यातील भोकरदनकडून धाडकडे येणाऱ्या एका मालवाहू वाहनात मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

बुलढाणा/धाड: विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर धाड पासून सात किमी अंतरावर असलेल्या म्हसला बुद्रूक येथे बुलढाणा पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत तब्बल ९२ लाख रुपयांच्या गुटख्यासह १ कोटी १४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल ९ नोव्हेंबर रोजी पहाटे जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. गेल्या सहा वर्षातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.

जिल्ह्यात अंमली पदार्थांसह, गुटका विक्री व तस्करीचे प्रमाण वाढले आहे. धाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोनच दिवसापूर्वी मध्यप्रदेशातून मराठवाड्यात नेण्यात येत असलेला २० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. त्या कारवाईपाठोपाठ ही माेठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व धाड पोलिसानी केली आहे.

८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जालना जिल्यातील भोकरदनकडून धाडकडे येणाऱ्या एका मालवाहू वाहनात मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने एलसीबी आणि धाड पोलिसांनी म्हसला गावानजीक सापळा रचला. त्यामध्ये डीडी-०१-सी-९१३१ क्रमांकाचे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यातील ९१ लाख ८८ हजार रुपयांचा ४ क्विंटल ५९ किलो ४०० ग्रॅम गांजा, २२ लाखांचा एक ट्रक, दोन मोबाईल असा १ कोटी १४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात राहूल गोटीराम साबळे (२७ रा. कुऱ्हा ता. मोताळा) यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचा दुसरबीड येथील एक सहकारी सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कारवाईत यांचा होता सहभाग

जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय अशोक लांडे, व अमलदारांचे एक स्वतंत्र पथक अमली द्रव्यासंदर्भात कारवाईसाठी गठीत करण्यात आले आहे. या पथकासह सहाय्यक पोलिस निरीक्षक मनिष गावंडे, नंदकिशोर काळे, पीएसआय श्रीकांत जिंदमवार, गजानन माळी, शरद गिरी, पंकज मेहेर, एजाज खान, दीपक लेकूरवाळे, राजकुमार राजूपत, अनंता परताळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश सोळंके हे करीत आहेत.

अलिकडील काळातील दुसरी मोठी कारवाई

कोरोना काळात सुंदरखेड परिसरात करण्यात आलेली एक कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होती. त्यानंतरची धाडनजीक करण्यात आलेली दुसरी मोठी कारवाई आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी