शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह असल्याचाचा बनावट अहवाल देणारी टोळी सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 10:31 IST

Fake report of corona positive : निवासी वैद्यकीय अधिकाºयांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात विविध गैरप्रकार घडल्याचे समोर येत असतानाच खामगाव येथील सामान्य रूग्णालयात बनावट अहवाल तयार करून देणाºया एकास  गुरूवारी पहाटे अटक केली आहे. सामान्य रूग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकाºयांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विजय राखांडे रा.पहुरजीरा ता. शेगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा खामगाव आणि परिसरातील अनेकांना फटका बसला. अनेकजण या संक्रमणाने बाधित झाले. त्याचवेळी या संसर्गामुळे मिळत असलेल्या दीर्घकालीन सुटी आणि विम्याचा आर्थिक लाभ लुटण्यासाठी काहींनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्या चेलेचपाट्यांनी साथ दिल्याचे समोर येत आहे. खामगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल रूग्णांचा दुसºयांदा स्वॉब घेत, खासगी कंपनी आणि औद्योगिक वसाहतीत असलेल्या कारखान्यातील कामगारांना पॉझिटिव्ह आणण्याचा गोरखधंदाच, कोरोना काळात चालविण्यात आला. एकापेक्षा अनेकांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याने बनावट अहवाल देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर खामगाव येथील सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी सामान्य रूग्णालयाचा कंत्राटी कामगार विजय राखोंडे याच्यासह इतरांविरोधात भादंवि कलम ४२० अन्वये तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सतर्क झालेले आरोपी फरार झाल्याचे समजते.

 कंत्राटी कर्मचाºयांचा प्रताप; विम्याचा दिला अनेकांना लाभ!- शहरातील औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यासह परिसरातील इतर उद्योगामध्ये काम करणाºया कर्मचाºयांना विम्याच्या लाभासाठी सामान्य रूग्णालयात कंत्राटी असलेल्या कर्मचाºयांकडून संगनमताने हा प्रकार करण्यात आला. यामध्ये एकापेक्षा अधिक आरोपी गुंतल्याची शक्यता समोर येत असून, पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. जनुना रोडवरील एका खासगी कंपनीतील अनेक कामगारांनी बनावट अहवालाद्वारे विम्याचा लाभ घेतल्याची जोरदार चर्चा आहे.  कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बनावट अहवाल देण्यासाठी कंत्राटी कर्मचारी आणि त्याच्या साथीदाराने प्रयत्न केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसांत सविस्तर तक्रार दाखल केली आहे. सामान्य रूग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या अनुपस्थितीत हा प्रकार करण्यात आला.-डॉ. निलेश टापरेनिवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य रूग्णालय, खामगाव.

 कोरोना विषाणू संक्रमित असल्याचा बनावट अहवाल देणाºया टोळीतील एकास शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.- सुनिल अंबुलकरशहर पोलिस निरिक्षक, खामगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव