शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात मोठ्या मुर्तींना बंदी; जिल्ह्यात काथ्याची मागणी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 13:10 IST

जेथे एका मुर्तीकाराकडे ३०० काथ्याचे बंडल लागत होते तेथे सध्या अवघे एखाद दुसरे बंडल सध्या लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गणेशोत्सवात मोठ्या मुर्त्यांना यंदा बंदी घालण्यात आल्यामुळे या मुर्त्यांच्या मजबुतीसाठी वापरण्यात येणाऱ्या नारळाच्या काथ्यांचीही मागणी जिल्ह्यात घटली आहे. जेथे एका मुर्तीकाराकडे ३०० काथ्याचे बंडल लागत होते तेथे सध्या अवघे एखाद दुसरे बंडल सध्या लागत आहे. त्यातच काथ्यांचा भावही यंदा वधारलेला असल्याने मुर्तीकारांसमोर समस्या निर्माण झाली आहे.बुलडाण्यात पूर्वी जेथे ८०० रुपयांच्या आसपास एक बंडल मिळत होते तेथे सध्या १२०० रुपयांचा भाव या बंडलाचा झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सव येथी गणेश मुर्ती जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मध्यप्रदेश, गुजरात, औरंगाबादसह पुणे जिल्ह्यातही येथील मुर्त्या जात असल्याने सण उत्सव काळात एका मुर्तीकाराकचे नारळाच्या काथ्याच्या जेथे चार ट्रक भरून येत होत्या तेथे आता मोजकेच नग लागत आहे. पिओपीच्या मुर्त्यांमध्ये प्रामुख्याने या काथ्यांचा मुर्तीच्या मजबुतीसाठी वापर केल्या जातो. मात्र यंदा मुर्तीच्या उंचीचे बंधन असल्याने मुर्तीकारांनी छोट्या मुर्त्या बनविण्यास प्राधान्य दिले असले तरी या मुत्यांना मागणी नाही. तसेच मर्यादीत स्वरुपातच घरगुती गणेशोत्सवासाठी नागरिकांनी मुर्त्यांची नोंदणी केली आहे. त्यामुळे सव या छोट्याच्या गावात मुद्रा लोण घेवून गणेश मुर्ती बनविण्याचा व्यवसाय करणाऱ्यांकडे यंदा कामगारांचीही संख्या कमी आहे. व्यापारी वर्गानेही अद्याप मुर्त्या घेण्यासाठी मुर्तीकारांचा कारखाना गाठलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट गणेशोत्वासह या उत्सवाशी निगडीत असलेल्या मुर्तीकारांवरही कोसळले असून आर्थिक व्याप्ती त्यामुळे या व्यवसायातील यंदा घटल्याचे चित्र आहे.एकट्या सव गावातील हे चित्र नसून बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असे व्यवसाय करणाºयांवर याचा विपरीत परिणाम झालेला आहे.

दुर्गा देवी, लक्ष्मीच्या मुर्तींचेही काम संथगतीनेआगामी काळातील सण उत्सव पाहता दसºया दरम्यानचा दुर्गा देवी उत्सव व दीपोतस्वातील लक्ष्मीच्या मुर्त्या बनविण्यासही अद्याप मुर्तीकारांनी प्रारंभ केलेला नाही. कोरोना संसर्गाचा विपरीत परिणाम हा ग्रामस्तरावही यातून जाणत आहे. त्यामुळे दुर्गादेवी, लक्ष्मीच्या मुर्ती बनवाव्यात कि नाही असा प्रश्न मुर्तीकारांसमोर उभा ठाकला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाGaneshotsavगणेशोत्सव