शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

 Ganesh Festival: ‘बाप्पां’च्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:32 IST

खामगाव : मंगलमूर्ती...विघ्नंहर्ता...सुखकर्ता... गणनायक...श्री गणेश... अशी नानाविध नावे असलेल्या बाप्पा मोरयाच्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : मंगलमूर्ती...विघ्नंहर्ता...सुखकर्ता... गणनायक...श्री गणेश... अशी नानाविध नावे असलेल्या बाप्पा मोरयाच्या स्वागतासाठी खामगाव नगरी सज्ज झाली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंडप व आरास सजावटीवर शेवटचा हात फिरवण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व्यस्त आहेत. तर घरगुती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी लागणाºया पूजा साहित्यासह पुरोहितांची वेळ ठरवण्यासाठी गणेशभक्तांची लगबग दिसत आहे. 

बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी लागणाºया साहित्यासह आरतीसाठी आवश्यक टाळ, आरतीची पुस्तके, ढोल अशा विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी भक्तांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. खामगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गणेशमूर्तीसोबतच  पूजासाहित्याचीही दुकाने आहेत. सोबतच शहरातील इतरही रस्त्यांवर तसेच मुख्य चौकात गणेशमूर्ती आणि पूजा साहित्याची दुकाने थाटली आहेत. पूजेसाठी आवश्यक कापूर, अगरबत्ती, निरांजन, ताम्हणपात्र, कलश, चौरंग अशा वस्तूंना अधिक मागणी होत आहे. 

गणेश स्थापनेचा शुभमुहूर्त!घरोघरी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. गुरूवारी बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. या दिवशी सकाळी ११.२१ पासून दुपारी १.४८ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. या वेळेत गणेशपूजन करणे अशक्य असल्यास, पहाटे चार वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी ६.४२ पर्यंत गणेशपूजन करावे, असे ज्योतिष्यांचा सल्ला आहे.

पर्यावरण पूरक साहित्याची रेलचेल!

प्लास्टिकबंदीमुळे यावर्षी पहिल्यादांच गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्याची मागणी वाढली आहे. या साहित्याची भाविकांकडून खरेदी करण्यात येत असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. पर्यावरण पूरक सजावट साहित्यासोबतच माती आणि शाडू मातीच्या गणेशमूर्तींनाही मोठी मागणी असल्याचे दिसून येते.

टॅग्स :khamgaonखामगावGanpati Festivalगणेशोत्सव