शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

 फाळणीमुळे नव्हे, तर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या - सौरभ हटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 13:54 IST

खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमहात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शहर) च्यावतीने गांधी हत्या समज अपसमज या विषयावर व्याख्यान.स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीचे योगदान, गांधीच्या हत्येचे सात प्रयत्न, हरिजन यात्रा, मीठाचा सत्याग्रह, असहकार-अहिंसा-सत्याग्रह या आंदोलनाच्या पध्दती या विषयावर सौरभ हटकर यांनी प्रकाश टाकला.

खामगाव : देशाची फाळणी केली म्हणून गांधीजींची हत्या झाली हा गैरसमज आहे. खरतंर देशाच्या फाळणीमुळे नव्हेतर बहुजन उद्धार कार्यामुळेच गांधीजींची हत्या झाल्याचे युवा व्याख्याते सौरभ हटकर यांनी स्पष्ट केले. गांधी हत्या समज अपसमज या विषयावर व्याख्यान करतांना ते बोलत होते. महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शहर) च्यावतीने येथील स्व. विलासराव देशमुख कॉटन मार्केट यार्डमधील मनोबल अभ्यासिकेत आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. गांधी हत्या समज अपसमज हा व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार योगेश फरपट तर नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष गणेश माने, लक्ष्मीनारायण फाउंडेशनचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव हटकर, ज्येष्ठ नेते समाधान पाटील, भारिप नेते अनिल क्षिरसागर,शेकापचे वासुदेवराव उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गांधींची हत्या का करण्यात आली याचा उहापोह करतांना सौरभ हटकर पुढे म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या ही कर्मठवाद्यांनी घडवून आलेला कट आहे. गांधींवर सोईनुसार आरोप करुन त्यांना बदनाम करण्याचाच प्रयत्न नेहमी झाला असल्याचा उल्लेख त्यांनी केला. स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीचे योगदान, गांधीच्या हत्येचे सात प्रयत्न, हरिजन यात्रा, मीठाचा सत्याग्रह, असहकार-अहिंसा-सत्याग्रह या आंदोलनाच्या पध्दती या विषयावर सौरभ हटकर यांनी प्रकाश टाकला. १९४८ साली महात्मा गांधी काही कारणास्तव नोबेल पारितोषीक मिळू शकले नाही त्याची भर संयुक्त भारताच्या प्रतिनीधींना म्हणजेच कैलास सत्यार्थी व युसूफ मलाला या नोबेल पारितोषीक देवून झाली असावी असेही त्यांनी आवर्जून सांगितले. तत्पुर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकृष्ण धुरंधर यांनी केले. कार्यक्रमाला स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यासोबत कॉलेज आॅफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी, लक्ष्मीनारायण मॉडेल स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :khamgaonखामगावMahatma Gandhiमहात्मा गांधी