शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा तालुक्यात २५० ठिकाणी चालतो जुगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:12 IST

काही भागात पोलीसांनी अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र अवैध धंद्यावाल्यांनी कोणाचेही न ऐकता पुन्हा हा व्यवसाय सुरु केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असून सुमारे २५० ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती आहे.एकट्या नांदुरा शहरात सध्या सुमारे १०० पेक्षा जास्त ठिकाणी जुगार सुरू आहे. काही भागात पोलीसांनी अवैध धंदे बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र अवैध धंद्यावाल्यांनी कोणाचेही न ऐकता पुन्हा हा व्यवसाय सुरु केला आहे.नांदुरा तालुक्यात प्रत्येक खेड्यात दोन ते चार ठिकाणी जुगार सुरू आहे. निमगाव, वडनेर, चांदुर-बिस्वा गावांमध्ये १० ते १५ वरलीची दुकाने असून अशी एकुण ग्रामीण भागात १५० च्या वर अवैध व्यवसाय करणारे असल्याने तालुक्यात सुमारे २५० ठिकाणी जुगार सुरू असल्याचे कळते.अवैध धंद्यांविरोधात पोलीस कारवाई करतात, मात्र काही काळानंतर पुन्हा परिस्थिती जैसेथे होते. अवैध धंद्याविरोधात स्थानीक पोलीस प्रशासन, उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधिक्षक, एल.सी.बी. बुलडाणा व जिल्हा पोलीस प्रमुखांचे पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते, परंतु शहरातील अवैध धंदे बंद होत नसल्याचे दिसून येते. चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे अवैध धंदे बंद होतातही, मात्र व्यवसाय करणारे ठिकाण बदलून दुसरीकडे बस्तान बसवित असल्याचे दिसून येते.गत काही दिवसांपासून अवैध धंद्यांच्या बाबतीत जिल्ह्यात नांदुरा शहराचे नाव मोठ्या प्रमाणावर गाजत असल्याचे दिसून येते. जळगाव जामोदशी धागे-दोरे!नांदुर येथे ‘अचल’ नावाने सुरू असलेला जुगार सध्या मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. ही वरली जळगाव जामोद येथे काढल्या जात असल्याचे समोर येत आहे. गत काही दिवसांपुर्वी नांदुरा शहरात खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांच्या पथकामार्फत मोठी कारवाई करण्यात आली होती. परंतु आता नांदुरा येथील वरलीचे कनेक्शन जळगाव जामोद येथे असल्याचे दिसून येत असल्याने पोलीसांना तिकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

नांदुरा शहर व तालुक्यातील जुगारांवर कारवाई सुरु आहे. नागरीकांनीही याबाबत जागृत राहुन ठिकाणासह जुगाराची माहीती दिल्यास माझे पथक तेथे छापा मारून कारवाई करेल.- प्रीया ढाकणे,उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर.

 

टॅग्स :Nanduraनांदूरा