शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मीच्या सजावटीला जीएसटीचा लगाम, मुखवट्यांसह विविध वस्तुंवर 12 ते 18 टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 20:58 IST

तीन दिवस चालणा-या महालक्ष्मीच्या उत्सवामध्ये सजावटीला मोठे महत्स असते. परंतु यावर्षी जीएसटीमुळे महालक्ष्मीच्या मुखवट्यांसह विविध वस्तुंवर १२ ते १८ टक्क्याने दरवाढ झाली आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा, दि. 18 - तीन दिवस चालणा-या महालक्ष्मीच्या उत्सवामध्ये सजावटीला मोठे महत्स असते. परंतु यावर्षी जीएसटीमुळे महालक्ष्मीच्या मुखवट्यांसह विविध वस्तुंवर १२ ते १८ टक्क्याने दरवाढ झाली आहे. महालक्ष्मीच्या या सजावटीला जीएसटीची झळाळी मिळाली असून दरवाढीनंतरही  हौसेपुढे किंमतीला मोल नसल्याचे  चित्र बाजारातील वाढत्या गर्दीमुळे दिसत आहे. गणेश स्थापनेनंतर चार दिवसाने म्हणजे २९ ऑगस्ट रोजी महालक्ष्मीची स्थापना करण्यात येणार आहे. महालक्ष्मीच्या या उत्सवामध्ये महालक्ष्मीचा श्रृंगार व इतर सजावट सर्वांचे लक्ष वेधत असते. त्यामुळे सजावट व साज श्रृंगाराला महिलांकडून मोठे महत्व दिल्या जाते. परंतु यावर्षी जीएसटी लागल्यामुळे मुखवट्यांसह विविध वस्तुच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामध्ये त्यामध्ये महालक्ष्मीच्या मुखवट्यांच्या किंमतीत कमीतकमी १० टक्के वाढ झाली असून मुखवट्यांचे दर यंदा ५५१ रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यत आहेत. तर महालक्ष्मीच्या ओढणीसाठी १२.५ टक्के दरवाढ झाली आहे. दागदागिन्यांच्या किंमती १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच कोठ्या, मखर सुद्धा १८ टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. दागदागिन्यांमध्ये कंबरपट्टा, मेखला, हार, चपलाहार, मुकुट व विविध प्रकार १५० पासून ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. कोठ्या ५०० पासून १५०० रुपयांपर्यंत उंची आणि आकारानुसार उपलब्ध आहेत. बाळांचे कपडे ३०० ते ५००, महालक्ष्मींचे हात २५० ते ४०० व लोखंडी स्टँटवरील महालक्ष्मीसाठी २ हजार ९०० रुपये मोजावे लागत आहेत. या वाढत्या दराचा हौसेपुढे कुठलाही परिणाम झाला नसल्याचे  बाजारातील वाढत्या गर्दीवरून दिसून येत आहे. बाजारात महालक्ष्मी साहित्याची खरेदीसाठी गर्दी वाढतच आहे.

बाजारात चैतन्याचे वातावरण...सण उत्सवावर यावर्षी दुष्काळाचे सावट दिसून येत होते. परंतु गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावणे सुरू केले आहे. पाच ते सहा दिवसांत  झालेल्या पावसाने बाजारातील आर्थिक उलाढालही वाढविली आहे. महालक्ष्मी उत्सवाचे सहित्य खरेदीसाठी सुद्धा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव