शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
4
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
5
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
6
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
7
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
8
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
9
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
10
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
11
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
12
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
13
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
14
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
15
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
17
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
18
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
19
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
20
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर

अमेरिकेत रंगला गजानन महाराजांचा पालखी सोहळा

By admin | Updated: September 9, 2014 19:17 IST

१२५ भक्तांचा सहभाग : धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

बुलडाणा: विदर्भाचा पंढरीनाथ ङ्म्री संत गजानन महाराजांच्या भक्ती व ङ्म्रद्धेचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला असून, अमेरिकेत महाराजांचा पहिला पालखी सोहळा भारतीय वेळेनुसार ७ सप्टेंबर रोजी अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.ङ्म्री गजानन महाराज अमेरिका परिवाराच्यावतीने या पालखी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेतील इर्वीन, कॅलिफोर्निया येथे आयोजित या सोहळय़ामध्ये अमेरिकेत स्थायिक असलेल्या महाराजांच्या १२५ भक्तांनी सहभाग घेतला. या भक्तांनी ह्यगण गण गणात बोतेह्ण चा गजर करून ङ्म्री गजानन नामाचा जयघोष केला. पालखी सोहळय़ास प्रारंभ करण्यापूर्वी ङ्म्री गणपती अथर्वशीर्ष, ङ्म्री गजानन आवाहन, ङ्म्री गजानन महाराज १0८ नामावलीसह पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ह्यगण गण गणात बोतेह्णचा नामघोष करीत ङ्म्री गजानन अष्टक, गजानन बावन्नीचे सामूहिक गायन करून पालखी सोहळय़ाला प्रारंभ झाला. पालखीची परिक्रमा झाल्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.नवीन पिढीला ङ्म्री संत गजानन महाराजांनी केलेले उपदेश आणि त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी, ङ्म्रद्धा आणि भक्ती परंपरा कायम राहावी, या उद्देशाने हा परिवार कार्यरत असून, परिवारातील कुणालाही नावाच्या प्रसिद्धीचा हव्यास नाही. या परिवारातील भक्तांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना याचा आवर्जून उल्लेख केला. ङ्म्रींच्या भक्तीचा प्रसार व्हावा, हाच या परिवाराचा निर्मळ उद्देश असल्याने अमेरिकेतील हा पहिला पालखी सोहळा देशभरातील भक्तांसाठीही प्ररेणादायी असाच ठरला आहे.अशी आहे पालखी** अमेरिकेत निघालेल्या पहिल्या पालखी सोहळय़ासाठी वापरण्यात आलेली पालखी लाकडाची असून, ती भारतातच तयार करण्यात आली आहे. येथील एका भक्ताने ती पालखी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पाठविली आणि तेथून ही पालखी ङ्म्री गजानन महाराज अमेरिका परिवाराकडे आली. या पालखीमध्ये गजानन विजय गं्रथ व ङ्म्रींच्या पादुका ठेवण्यात आल्या. पालखी सोहळय़ात भगवी पताका, पालखीसोबतचा चांदीचा राजदंड व पालखीवर नक्षीदार छत्र आणि अंबरही होते. या परिक्रमेची अमेरिकेतील नागरिकांमध्येही उत्सुकता होती. त्यांनी या पालखी सोहळय़ाची माहितीही जाणून घेतली.** असा आहे अमेरिका परिवारङ्म्री गजानन महाराज अमेरिका परिवार या नावाने ओळखल्या जाणार्‍या या परिवाराची स्वतंत्र वेबसाईट आहे. दर महिन्याला गजानन महाराज नामजप सोहळा इंग्लंडमधील संदरलॅन्ड, अमेरिकेतील साऊथ फ्लोरिडा, लॉस एंजेलिस, सन फ्रान्सिस्को आदी ठिकाणी आयोजित केला जातो. प्रत्येक ठिकाणी किमान ४0 पेक्षा जास्त भक्त सहभागी होतात. यासोबतच वेबकॉन्फरन्सिंगमार्फत संपूर्ण जगभरातून महाराजांचे भक्त या परिवाराशी ह्यकनेक्टह्ण आहेत. विशेष म्हणजे सर्व भक्तांसाठी दररोज ३0 मिनिटे ह्यगण गण गणात बोतेह्ण हा नामजप टेली कॉन्फरन्समार्फत केला जातो.