शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमेरिका, इंग्लंडमध्येही साजरा झाला गजानन महाराजांचा प्रकटदिन महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:24 IST

शेगाव : श्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रगटदिन उत्सव १० फेब्रुवारी रोजी अमेरीकेत श्रींच्या मंदीरात भक्तांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक़्रमाव्दारे मनोभावे साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देन्यूजर्सी, शिकागो, उल्लास, फोनिक्स, सिएटल, लॉस एंजेलिस आणि लंडन (इग्लंड) येथे श्रींचा प्रगटदिन उत्सव साजरा केला.शिकागो येथील उत्सवात लहान मुलांकडून श्री गजानन विजय ग्रंथाचा पहीला अध्याय वाचण्यात आला.फोनिक्स येथे श्री प्रकटदिन उत्सव साजरा करण्यात आला व श्रींची पालखी काढण्यात आली.

-  गजानन कलोरेश्री गजानन महाराज यांचा १४० वा प्रगटदिन उत्सव १० फेब्रुवारी रोजी अमेरीकेत श्रींच्या मंदीरात भक्तांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक़्रमाव्दारे मनोभावे साजरा करण्यात आला. शनिवार १० रोजी श्री गजानन महाराज अमेरीका भक्त परिवार यांच्यावतीने न्यूजर्सी, शिकागो, उल्लास, फोनिक्स, सिएटल, लॉस एंजेलिस आणि लंडन (इग्लंड) इत्यादी ठिकाणी श्रींचा प्रगटदिन उत्सव साजरा केला आहे.श्रीभक्तांचा श्रध्देचा महिना भारतातच नव्हे तर भारता बाहेर ही दिवसागणीत वाढत आहे. श्रीभक्त आपल्या परिने श्रींचा प्रगटदिनच नव्हे दररोज नित्याने श्रींची आरती व पुजा भक्तीभावो करत असतात. न्यूजर्सी येथील श्री साईदत्त पिठम मंदीरात प्रगटदिन साजरा करण्यास्तव बरेच दिवस आधी तयार करण्यात आली. यात ‘श्री’ चे आवाहन, नामजप, अभिषेक, गजानन बावन्नी आणि गजानन चालीसा वाचण्यात आली. लहान मुलांकडून ‘गजानन महिमा’ हे एक छोटेसे नाटक सादर करण्यात आले. ‘श्री’ च्या भक्तांकडून भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. ‘श्री’ ची महाआरती आणि नंतर छप्पनभोग अर्पण करण्यात आले व महाप्रसाद वितरण करण्यात आला. अंदाजे ३५० लोकांनी भक्तांनी सहभागी होवून ‘श्री’ चा आर्शीवाद दर्शन व महाप्रसाद घेतला. तर लहान मुलांनी गणगणात बोते जप केला. उल्हास (टेक्सास) येथील मंदीरात प्रकटदिन साजरा केला. अंदाजे २५० भक्तांनी ‘श्री’ चे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. ‘श्री’ ची अलंकार पुजा अभिषेक हार आणि फुलांची सजावट, पारायण श्रींची पालखी लेझीम, अन्नदान आणि इतर व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे युट्युबवर प्रसारण करण्यात आले.शिकागो येथील उत्सवात लहान मुलांकडून श्री गजानन विजय ग्रंथाचा पहीला अध्याय वाचण्यात आला. तसेच श्रींची पालखी काढण्यात आली. हे उत्सवाचे मुख्य आकर्षण होते.सिएटल येथे श्रींची महापुजा आणि छपन्नभोग अर्पण करण्यात आले. तसेच पालखी काढण्यात आली. फोनिक्स येथे श्री प्रकटदिन उत्सव साजरा करण्यात आला व श्रींची पालखी काढण्यात आली. पालखी भक़्तांनी हाताने बनविली होती. अटलांटा येथे स्वामी सत्यनारायण मंदीरात उत्सव साजरा करण्यात आला हे श्रींचे अमेरिकेतील पहिले मंदिर आहे. भक़्तांनी बनविलेल्या १०० प्रकारचा महाप्रसाद अर्पण करण्यात आला. व पालखी सोहळा काढला.लॉस एंजेसिस येथे लहान मुलांनी केक कापून प्रकट उत्सवात भर घातली. लंडन (इंग्लंड) येथेही श्रींची महापुजा अभिषेक, महाआरती आणि महाप्रसाद वितरण करुन उत्सव साजरा करण्यात आला. अशाप्रकारे ८ ठिकाणी गजानन महाराज अमेरिका भक्त परिवार तर्फे गजानन महाराजांचा प्रकटदिन साजरा करण्यात आला.भक्त व अमेरीकेतील रहिवाशी श्रींच्या मंदीरात आपल्या परिने सुटीच्या दिवशी व इतरवेळी सेवा देवून मंदीराताच नव्हे तर मित्र परिवारांच्या घरी सुटीच्या दिवशी श्रींची श्रध्दा स्वरुपात गणगणगणात बोते जप व अध्यायाचे वाचन नित्य करीत असतात व श्रींच्या प्रति आपली श्रध्दा वृध्दीगत करीत असतात. श्रींची भक्तीरुप सेवा अर्पण करतात.

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजAmericaअमेरिकाEnglandइंग्लंडShegaonशेगावPrakatdinप्रकट दिन