शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

गजानन महाराज मंदिराने सुरु केले कम्यूनिटी किचन; दररोज २००० भोजन पाकिटांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 14:21 IST

दोन हजार भोजन पाकिटे शेगावातील निवारागृहे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पुरविण्यात येत आहेत.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ‘कम्यूनिटी किचन’ सुरु केले.गरजु कुटुंबांनाही घरपोच भोजन पाकिटे देण्यात येत आहे.

 बुलडाणा : विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर संस्थानही लॉकडाउनच्या काळात जनसामान्यांच्या मदतीसाठी धावून आले आहे. सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या संस्थानने जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत ‘कम्यूनिटी किचन’ सुरु केले असून, मंदिराच्यावतीने शहरात दररोज २००० भोजन पाकिटांचे वितरण करण्यात येत आहेत. सकाळी १००० व सायंकाळी १००० असे दोन वेळा एकून दोन हजार भोजन पाकिटे शेगावातील निवारागृहे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पुरविण्यात येत आहेत. तसेच शहरात अडकून पडलेले मजुर, सामाजिक संस्थांनी शोधून काढलेली गरजु कुटुंबांनाही घरपोच भोजन पाकिटे देण्यात येत आहे.शेगावचे गजानन महाराज मंदिर संस्थान वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनात संस्थांच्या वतीने वर्षभर विविध सेवाकार्य सुरूच असतात मात्र नैसर्गिक आपत्तीच्या काळातही शेगाव संस्थान हे मदतीसाठी सर्वात पुढे  आहे. सध्या बुलढाणा शहरांमध्ये कोरोनाचे पाच पॉझिटिव्ह रुग्ण यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा हा सील करण्यात आला आहे. तर बुलढाणा शहर हे हाय रिस्क झोनमध्ये टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत तीत गरीब मजूर अडकलेले प्रवासी बेघर भटके अनाथ यांच्यासाठी भोजन देण्याकरता जिल्हा प्रशासनाने श्री संत गजानन महाराज संस्थांना विनंती केली होती. त्यानुसार शेगाव संस्थांनी कम्युनिटी किचन सुरू केली असून दोन एप्रिल पासून २००० लोकांसाठी बकेट स्वरूपामध्ये भोजन प्रसाद वितरीत केल्या जात आहे. प्रशासनाच्यावतीने समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हे काम पाहत आहेत बुलढाण्यात तसेच बुलढाणा शहराच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या नाथजोगी सारख्या भटक्या समाजालाही लाभ होत आहे.

टॅग्स :ShegaonशेगावGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर