शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

"श्रीं" च्या प्रकटदिनाचा असाही योगायोग; तिथी व तारीख आली जुळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 18:00 IST

Gajanan Maharaj Prakat Din : श्री संत गजानन महाराजांचा १४४ वा प्रगटदिन  बुधवार दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजी शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात व देश-विदेशात साजरा होत आहे.

- नानासाहेब कांडलकर

 जळगाव (जामोद) : श्री संत गजानन महाराजांचा १४४ वा प्रगटदिन  बुधवार दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजी शेगावसह संपूर्ण महाराष्ट्रात व देश-विदेशात साजरा होत आहे. या वर्षीच्या प्रकटदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे "श्रीं"च्या प्रकटदिनाची तारीख व तिथी ही एकाच दिवशी आली आहे.अभ्यासकांच्या मते असा हा योगायोग काही वर्षांनंतर जुळून आला आहे.     ज्या दिवशी श्री गजानन महाराज प्रकट झाले.तो दिवस शनिवार होता.यावेळी तिथी व तारीख एक असली तरी दिवस मात्र बुधवार आहे.माघ वद्य सप्तमी शके १८०० दिनांक २३ फेब्रुवारी १८७८ रोजी श्री गजानन महाराज प्रकट झाले.काही वर्षानंतर यावर्षी तिथी व तारीख एकच आली आहे. त्यामुळे या प्रकटदिनाला भक्तांकडून विशेष महत्त्व दिले जात आहे.कोविड-19 चा प्रादुर्भाव नसता तर विदर्भपंढरी संतनगरीसह महाराष्ट्रात व देश-विदेशात श्रींचा हा प्रगट दिन निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर साजरा झाला असता.परंतु कोविडचे नियम पाळत श्रींच्या भक्तांकडून प्रकटदिनाची तयारी ठिकठिकाणी सुरू झाली आहे.

"श्रीं"च्या प्रकट होण्याचा प्रसंग या पृथ्वीतलावर परमेश्वराने जगाच्या उद्धारासाठी अनेक असे अवतार घेवून भक्तांचा उद्धार केला. त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज यांनी प्रत्यक्ष जगाच्या उद्धारासाठी प्रकट होवून अवतार कार्य केले.ते शेगावी वटवृक्षाखाली माध्यान्ह वेळी ऐन तारूण्याअवस्थेत एकदम प्रगट झाले.त्यावेळी ते तीस बत्तीस वर्षाचे असावे असा अंदाज आहे.उष्ट्या पत्रावळीतील भातशेते निजलीलेने वेचून खात असताना बंकटलाल व दामोदर पंत यांना श्री गजानन महाराज दिसले.तो दिवस होता माघ वद्य सप्तमी.हाच दिवस "श्रीं" चा प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो.या वर्षी "श्रीं" चा १४४ वा प्रकट दिन आहे.

 प्रकट दिनाच्या सप्ताहास प्रारंभश्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराज संस्थानसह श्रींच्या मंदिरामध्ये माघ वद्य प्रतिपदा ते माघ वद्य सप्तमी असे सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.होम-हवन,कीर्तन,प्रवचन,भजन,काकडा, हरिपाठ,"श्रीं"च्या विजय ग्रंथाचे पारायण अशा अध्यात्मिक कार्यक्रमांनी हा सप्ताह साजरा केला जातो.या वर्षी तिथी व तारीख एक आल्याने श्रींच्या भक्तांचा उत्साह हा मोठा राहणार आहे.गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी पासून या सप्ताहाला सुरुवात होत आहे.बुधवार दिनांक २३ फेब्रुवारीला श्रींच्या प्रगटदिनानंतर हा सप्ताह संपेल.

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजShegaonशेगाव