शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जऊळका सरपंचावरील अविश्वासचे भवितव्य गुरुवारी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:33 IST

साखरखेर्डा/ जऊळका : सिंदखेडराजा तालुक्यातील जऊळका सरपंचाविरुद्ध ४ ऑगस्टला सहा विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव पारित झाला हाेता. या ...

साखरखेर्डा/ जऊळका : सिंदखेडराजा तालुक्यातील जऊळका सरपंचाविरुद्ध ४ ऑगस्टला सहा विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव पारित झाला हाेता. या ठरावावर आता २ सप्टेंबर राेजी हाेणाऱ्या ग्रामसभेत मतदान घेण्यात येणार आहे़

जऊळका ग्रामपंचायतीच्या सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्या विरुध्द उपसरपंच नामदेव बुधवंत यांच्यासह ८ सदस्यांनी ३० जुलैला अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर तहसीलदार सुनील सावंत यांनी ४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेतली. यामध्ये गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यामध्ये सरपंच द्वारकाबाई सांगळे यांनी गुप्त मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानुसार तहसीलदार सुनील सावंत यांनी गुप्त मतदान घेतले. सर्वांसमक्ष मतमोजणी करण्यात आली असता अविश्वास ठरावाच्या बाजूने ६ सदस्यांनी मतदान केले, तर दोन मते विरुद्ध पडली. त्यानुसार सरपंच द्वारकाबाई सांगळे यांच्या विरुद्ध ठराव पारित झाल्याचे तहसीलदारांनी जाहीर केले हाेते. थेट जनतेतून सांगळे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यामुळे या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी २ सप्टेंबर राेजी जिल्हा परिषद शाळेत ग्रामसभा आयाेजित करण्यात आली आहे़

सर्वांना बजावल्या नाेटीस

सिंदखेड राजा तहसीलदारांनी जऊळका ग्रामपंचायतीच्या सरंपच, सचिव व संबंधितांना नाेटीस बजावली आहे. २ सप्टेंबर राेजी जिल्हा परिषद शाळेत ही ग्रामसभा घेण्यात येणार आहे. काेराेनाविषयक नियमांचे पालन करून ही ग्रामसभा घेण्याचे आदेश सिंदखेड राजाचे तहसीलदार सावंत यांनी दिले आहेत.