शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

उमेदवारांचे ‘गाठी-भेटी’वर भवितव्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:44 IST

बुलडाणा : जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या २७९ ग्राम पंचायत निवडणूकीचा जाहीर प्रचार मतदानाच्या २४ तासापूर्वी  बंद होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदाच्या  उमेदवारांचे भवितव्य आता ‘गाठी-भेटी’वर अवलंबुन असून  त्यासाठी ‘डोअर-टू-डोअर’ प्रचार करण्याकरिता उमेदवार रात्रं- दिवस पायपीट करत आहेत. 

ठळक मुद्दे‘डोअर-टू-डोअर’ प्रचार मतदानाच्या २४ तासापूर्वी जाहीर प्रचार होणार बंद!

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी होणार्‍या २७९ ग्राम पंचायत निवडणूकीचा जाहीर प्रचार मतदानाच्या २४ तासापूर्वी  बंद होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदाच्या  उमेदवारांचे भवितव्य आता ‘गाठी-भेटी’वर अवलंबुन असून  त्यासाठी ‘डोअर-टू-डोअर’ प्रचार करण्याकरिता उमेदवार रात्रं- दिवस पायपीट करत आहेत. डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूका  ७  ऑक्टोबर रोजी होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील २७९ ग्राम पंचायतींचा समावेश असून, मेहकर तालुक्यातील ५0 ग्राम पंचायत, बुलडाणा तालुक्यात १२, मलकापूर ११, मोताळा ११,  नांदुरा १३, खामगाव १३, शेगाव १0, जळगाव जामोद १९,  संग्रामपूर २१, चिखली २८, देऊळगाव राजा १९ व लोणार  तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतच्या निवडणूका आहेत. म तदानासाठी एकच दिवस उरला असल्याने जिल्ह्यातील २७९  ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा राजकीय आखाडा चांगलाच ता पला आहे. ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांचा  जाहीर प्रचार मतदानाच्या २४ तासापूर्वीच बंद होणार असल्याने  उमेदवारांचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार वाढला आहे. ग्रामपंचाय तीवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी  सुद्धा गाव पुढार्‍यांकडून जोरदार फिल्डिंग लावली आहे. तालुकास्तरावरील राजकीय मंडळींनी ज्या ग्रामपंचायतमध्ये हस् तक्षेप केला, अशा गावांमध्ये राजकीय वातावरण आणखीणच  ढवळूण निघाले आहे. यावर्षी प्रथमच गावचे सरपंच थेट जनते तून निवडले जाणार असल्याने सरपंच पदाची निवडणूक ही  अटीतटीची होत आहे.  मतदानासाठी आता एकच दिवस हातात  उरल्याने उमेदवार रात्रं-दिवस एक करून घरोघर पिंजून काढत  आहेत. 

सरपंच पदाच्या उमेदवारांचा हायटेक प्रचारावर भरग्रामपंचायतचा प्रचार प्रत्यक्ष भेटी किंवा मतदरांच्या बैठका  घेण्यापलीकडे जात नाही.  परंतू यावर्षी पहिल्यांदाच सरपंच  पदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने प्रचाराचे स्वरूप  सुद्धा बदलले दिसून येत आहे. अनेक ग्रामपंचायतमध्ये सरपंच  पदासाठी युवा उमेदवार समोर आलेले आहेत. त्यामुळे सरपंच  पदाच्या या उमेदवारांचा हायटेक प्रचारावर अधिक भर आहे.  त्यामध्ये व्हॉट्स अँप, फेसबुक आदी माध्यमांचा वापर केला जा त आहे. अनेक उमेदवारांनी स्वत: चा परिचय व विकास  कामांची माहिती देणारे ऑडीओ, व्हिडीओ क्लिप तयार केली  असून या ऑडीओ, व्हिडीओच्या माध्यमातून हे उमेदवार आ पला प्रचार करत आहेत.   

पडद्याआडून अवैध दारूचा व्यवसाय फोफावलाग्रामीण भागाच्या राजकारणात ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत प्र तीष्ठेची समजल्या जाते. काही गावांमध्ये तर सख्खे नातलग  सुद्धा सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र आहे.  दारूबंदीच्या या काळातही पडद्याआडून अवैध दारूचा व्यवसाय  चांगलाच फोफावला आहे. जिल्ह्यातील पोलिस्ट स्टेशन अंतर्गत  ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या क्षेत्रामध्ये दररोज हजारो रु पयांची दारू जप्त होत आहे. त्यामुळे दारूबंदीच्या या काळात  दारूचा महापूर येतो कोठून याच्या मुळापर्यंत पोहचणे गरजेचे  झाले आहे.