शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शहीद प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 12:19 IST

Funeral of martyr Pradip Mandale त्यांचे पार्थिव अैारंगाबाद येथून सिंदखेड राजा तालुक्यातील त्यांच्या मुळगावी पळसखेड चक्का येथे आणण्यात येईल.

ठळक मुद्देप्रदीप मांदळे यांचा हिमकडा कोसळून १५ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये ही घटना घडली होती.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील शहीद सैनिक प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.२०) सकाळी ९:३० वाजेदरम्यान त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचे पार्थिव दिल्ली येथे पोहोचले होते.पळसखेड चक्का येथील सैनिक प्रदीप मांदळे यांचा हिमकडा कोसळून १५ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये ही घटना घडली होती. प्रदीप मांदळे हे २००८ मध्ये सैन्यात भरती झाले होते. गेल्या ऑगस्ट महिन्यात ते १५ दिवसांच्या सुटीवर गावी येऊन गेले होते. तीच त्यांची कुटुंबीयांशी शेवटची भेट ठरली होती. दिल्लीवरून त्यांचे पार्थिव मुंबई येथे आणण्यात येईल. तेथून ते अैारंगाबाद येथे आणण्यात येईल. तेथे त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर रविवारी (दि. २०) सकाळी ६ वाजता त्यांचे पार्थिव अैारंगाबाद येथून सिंदखेड राजा तालुक्यातील त्यांच्या मुळगावी पळसखेड चक्का येथे आणण्यात येईल. तेथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बी. एन. पडघान यांनी दिली. या अंत्यविधीच्या कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासह अन्य अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMartyrशहीद