शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ात जलयुक्त शिवारच्या कामांना निधीचा ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:00 IST

हिवरा (बुलडाणा): जिल्हय़ात गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेची कामे धडाक्यात सुरू आहेत. कामाचा दर्जाही तुलनेने चांगला आहे; मात्र ज्या यंत्रणेंतर्गत ही कामे पूर्ण करण्यात आली त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हय़ात झालेल्या कामांची ४६ कोटी ९0 लाख रुपयांची देयके थकीत झाली आहे. परिणामी जलयुक्तच्या चालू वर्षातील कामांना ब्रेक लागण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे४७ कोटी रुपयांची देयके थकली कामे प्रभावित होण्याची भीती

ओमप्रकाश देवकर। लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा (बुलडाणा): जिल्हय़ात गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेची कामे धडाक्यात सुरू आहेत. कामाचा दर्जाही तुलनेने चांगला आहे; मात्र ज्या यंत्रणेंतर्गत ही कामे पूर्ण करण्यात आली त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हय़ात झालेल्या कामांची ४६ कोटी ९0 लाख रुपयांची देयके थकीत झाली आहे. परिणामी जलयुक्तच्या चालू वर्षातील कामांना ब्रेक लागण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.वास्तविक थर्ड पार्टी असेसमेंटद्वारे जिल्हय़ातील जलयुक्तची कामे व त्यांची गुणवत्ता मध्यंतरी तपासण्यात आली होती. त्यांचा दर्जा ही चांगला होता. टँकरग्रस्त बुलडाणा जिल्हा टंचाईपासून मुक्त होण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची आहे. गेल्या तीन वर्षाच्या काळात या योजनेचा शेतकर्‍यांना चांगला लाभ झाला आहे; मात्र बुलडाणा जिल्हय़ात झालेल्या कामांची देयके रखडल्याने समस्या निर्माण झाली आहे. आता उन्हाळ्य़ाच्या तोंडावर चालू वर्षासाठीच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कामाची गती वाढविण्याची गरज आहे; मात्र नेमक्या याच काळात हा निधी थकलेला असल्याने अडचण येत आहे.दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने राज्यात भाजपा सरकारने महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना आणली होती. मुख्यमंत्री, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या योजनेत विशेष लक्ष घालून कामे प्रभावीपणे होतील, याची काळजी घेतली. त्यामुळे अभियानाला गती आली होती. या योजनेंतर्गत जिल्हय़ातील जवळपास १७ यंत्रणांतर्गत कामे होत आहेत. यामध्ये कृषी विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभाग, राज्य सिंचन विभाग, वन विभाग तसेच शासनाच्या इतर विभागाकडूनही कामे होत आहे. जिल्हय़ातील जलयुक्त शिवार योजनेच्या २0१५-१६ आणि २0१६-१७ या आर्थिक वर्षामधील जलसंधारणाची कामे कंत्राटदारांनी पूर्ण केली आहे; पण देयकेच मिळालेली नाही. त्यामुळे जिल्हय़ातील ही कामे चालू आर्थिक वर्षात प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामध्ये २0१५-१६ या वर्षातील २८ कोटी ५५ हजार आणि २0१६-१७ या वर्षाची १८ कोटी ३५ हजार असे मिळून ४६ कोटी ९0 हजार रुपयांची देयके थकली आहेत.

जलयुक्त शिवार अभियानातून जी कृषी विभागाची कामे करण्यात आलेली आहेत, त्या कामांची देयके अदा करण्यासाठी निधीची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यानुषंगाने पाठपुरावा सुरू आहे.- गणेश भागवत गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर

आमच्यासह इतरही कंत्राटदारांनी शासनाचे काम असल्याने लाखो रुपये या कामात गुंतविले. व्यवसाय म्हटला की, बँकेच्या व्याजाचे पैसेसुद्धा या कामात गुंतविले. बँकांचेही हप्ते थकले. - निखिल क्षीरसागर,  मार्डी, जि. सोलापूर

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार