शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वित्त आयोगाच्या निधीला कोलदांडा

By admin | Updated: March 16, 2016 08:37 IST

निधी खर्च करण्यासाठी गटविकास अधिका-याचेही परवानगी पत्र घेण्याबाबत प्रशासनाच्या सूचना.

राजेश शेगोकार / बुलडाणा पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट व्हावी म्हणून केंद्र शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला असून, ग्रामपंचायतींच्या खात्यात निधी वळता केला आहे. सरपंच व ग्रामसचिवाच्या सहीने ग्रामपंचायतच्या खात्याचे व्यवहार होतात; मात्र हा निधी खर्च करण्यासाठी गटविकास अधिकार्‍याचेही परवानगी पत्र घेण्याबाबत सूचना करून प्रशासनाने बुलडाण्यात मात्र या निधीमध्ये कोलदांडा घातला आहे.ग्रामपंचायतकडून या निधीमध्ये अनियमितता होणार असल्याचे कारण दाखवित जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी गटविकास अधिकार्‍यांना पत्र देऊन निधी ग्रामपंचायत परस्पर खर्च करणार नाही, याचे नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ग्रामपंचायतच्या अधिकारावरच गदा आली आहे.१४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतला दिला असून, शासनाने त्या खर्चाबाबत नियमावली पण दिली आहे; मात्र त्या नियमामध्ये केवळ बुलडाणा जिल्हा परिषदेने भर टाकून हा निधी खर्च करण्याबाबत बंधने टाकली आहेत.

*पं.स.ने आणले निधी वापरण्यावर नियंत्रण मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी गटविकास अधिकार्‍यांना पत्र पाठवून १४ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाबाबत गटविकास अधिकार्‍यांची जबाबदारी निश्‍चित केली आहे. हा निधी खर्च करताना ग्रामपंचायतकडून अनियमितता होण्याची शक्यता या पत्रात व्यक्त केली आहे, तसेच हा निधी ग्रामपंचायतने खर्च करण्यासाठी गटविकास अधिकार्‍याची परवानगी घेतली जावी, अशा स्पष्ट सूचना सीईओ मुधोळ यांनी दिल्या असून, गटविकास अधिकार्‍यांनी बँकांनाही याबाबत सुचित करावे, असे निर्देश दिले आहेत. या पत्रामुळे व ग्रामपंचायतच्या बँकेतील खा त्यावर एकप्रकारे गटविकास अधिकार्‍याचे नियंत्रण आले असून, हा प्रकार ग्रामपंचायतच्या अधिकारावर गदा आणणारा ठरला आहे.*अध्यादेशाचेही उल्लंघनराज्य शासनाने डिसेंबर २0१४ मध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीबाबत स्पष्ट सूचना देणारा अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशात निधीच्या खर्चावर गटविकास अधिकार्‍याचे नियंत्रण असावे, असे कुठेही म्हटलेले नाही. विशेष म्हणजे असा पत्रप्रपंच हा राज्यात एकमेव बुलडाण्यात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाच्या अध्यादेशाचेही उल्लंघन केले आहे. *बीडीओंचे बँकांना पत्र गटविकास अधिकार्‍यांनी सर्व बँकांना आपल्या स्तरावरून पत्र पाठवून ग्रा.पं खात्यातील निधी काढण्यापूर्वी गटविकास अधिकार्‍यांच्या परवानगीचे पत्र तपासावे, अशा सूचना दिल्या आहेत. ग्रापंचे खाते हे सरपंच आणि ग्रामसचिव यांच्या स्वाक्षरीने कार्यान्वित असल्याने यामुळे ग्रा.पं.ची स्वायत्तता धोक्यात आली आहे.